मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Sunday, August 11, 2024

मराठवाडा न्युज नेटवर्क च्या व्हिडिओ बातमी

महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशन आणि बीड जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे नाव बदनाम  करणाऱ्याला थारा देणार नाही:-राष्ट्रीय फुटबॉलपटू नविद मशायक







बीड:-महिलांचे लैंगिक शोषण करणारा आमेर काझी ला अटक!








गेवराई टिपरे व सोंग लोककला कायम जतन करू - विजयसिंह पंडित.


Continue Reading...

Monday, July 22, 2024

गेवराईचा आमदार ओबीसीतूनच झालाच पाहिजे - प्रा. लक्ष्मण हाके

गेवराईचा आमदार ओबीसीतूनच झालाच पाहिजे - प्रा. लक्ष्मण हाके 
गेवराई दि.२२ (प्रतिनिधी ) -ओबीसीच्या हक्काची जाणीव ठेवून काम करणारी दहा-पाच पोरं विधानसभेच्या सभागृहात बसली पाहिजेत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दलित, ओबीसीची मोट बांधून एकदिलाने काम करावे लागणार आहे. तरच गेवराईचा आमदार ओबीसीतून होईल. भावांनो ती  वेळ आली असून उद्याचा आमदार आपलाच झाला पाहिजे, असे जाहीर आवाहन करून अठरापगड जातीची मने समजून न घेता, केवळ मतासाठी आपला वापर झाल्याचा गंभीर आरोप ओबीसी आरक्षण बचावचे नेते प्रा .लक्ष्मण हाके यांनी गेवराई येथे  बोलताना केला. 

सोमवार दि . २२ जुलै  रोजी दु. १  वाजता गेवराई शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसीतून आरक्षण बचाव जन आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गेवराई तालुक्यातील ओबीसीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जन आक्रोश मेळावा आयोजित केला होता. गेवराई शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शहागड येथे ओबीसी जन आक्रोश रॅलीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बागपिंपळगाव येथून त्यांची उघड्या जीपमधून भव्य रॅली काढण्यात आली. शहरातील ओबीसी गटाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रा. हाके यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार स्वागत केले. विविध अठरा पगड जातींच्या ओबीसींच्या हस्ते प्रा . लक्ष्मण  हाके व नवनाथ आबा वाघमारे आणि कोअर टीमचे स्वागत करण्यात आले . वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले . प्रा. हाके यांनी जोशपूर्ण अभ्यासपूर्ण भाषेत आरक्षणाचा प्रश्न, लढा सविस्तरपणे मांडून ओबीसींची मने जिंकली. ते म्हणाले,एवढे वर्ष झाली आजवरच्या सत्तारूढ पक्षाने
अठरापगड जातीचे अंतःकरण समजून घेतले नाही. म्हणून आपण मागे राहिलोत. असे असताना  जरांगे-पाटील आमच्या ताटातले का मागत आहेत ? शेकडो वर्षांपासून सत्तारूढ आहात. 

एका बाजुला क्षत्रिय म्हणता आणि पुन्हा कुणबी म्हणायचे ? असा रोखठोक सवाल करून ते म्हणाले की, लोकसभेचा निकाल भाजपा विरूद्ध गेला. भाजपाचा पराभव जरांगे-पाटील यांनी केला. असा भ्रम दूर करण्याची गरज आहे. आम्ही 60% आहोत. भविष्यात दलित,मुस्लिम ,दलित,ओबीसी युती झाली पाहिजे. ती काळाची गरज म्हणून गेवराई तालुक्यातील सर्व ओबीसी समाजाने लहान लहान जातींना सोबत घेण्याची गरज आहे. तरच गेवराई विधानसभेत ओबीसीचा आमदार निवडून जाईल, असा दृढ विश्वास प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले . यावेळी प्रा पी टी चव्हाण, सुघोष मुंढे यांचीही समयोचित भाषणे झाली . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा . चव्हाण, परमेश्वर वाघमोडे, प्रा. गणपत काकडे , दादासाहेब चौधरी , बापू गाडेकर , अंबादास पिसाळ, फुलचंद बोरकर, गजानन काळे, मयुरी मस्के,देवकते ,खटके तात्या आदींनी  परिश्रम घेतले . प्रा . हाके यांच्या भाषणादरम्यान काही उत्साही लोक  घोषणा देत होते . सभेस हजारो ओबीसी बांधव उपस्थित होते .
Continue Reading...

Tuesday, July 16, 2024

नीरज राजगूरू यांचा दणका;हद्दपारीसाठी बजावल्या गून्हेगार यांना नोटीसा

नीरज राजगूरू यांचा दणका;हद्दपारीसाठी बजावल्या गून्हेगार यांना नोटीसा


चकलांबा ठाणे हद्दीतील पाच तर गेवराई ठाण्याचा एक प्रस्ताव 

गेवराई दि 16 ( वार्ताहार ) चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत दहशत माजवणे तसेच वारवार कायदेशीर कार्यवाई करूण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अश्या सहा जणांविरूद्ध गेवराई व चकलांबा यांच्या ठाणे प्रमुखांनी हद्दपारीचे सहा प्रस्ताव उप विभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत तसेच यांच्यावर अंतिम मंजूरीसाठी हे प्रस्ताव पाठवले जाणार असल्याची माहिती असून या संदर्भात नोटीस आल्याने गून्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

   याबाबद सविस्तर माहिती अशी की, परिसरात दहशत माजवणे,जबरी,चोरी,खूनाचा प्रयत्न करणे अश्या गंभीर स्वरूपाचे गून्हे यांच्यावर दाखल आहेत तसेच आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्याला प्रत्येक वेळी पोलिस प्रशासनाकडून सक्त ताकिद करण्यात येत होती परंतू तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होणे व कायदा व सुवैस्था बिघडवणे वेगवेळे गून्हे त्यांच्याकडून घडत होते याच प्रमुख कारणामुळे त्यांच्यावर ही हद्दपार करण्यासाठी ठाणे प्रमुखांना गेवराई उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगूरू यांनी दिल्या होत्या अश्या कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56 ( 1 ) ( अ ) अन्वे बीड जिल्हाच्या हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात का? येऊ नये तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे शिफारस का? करू नये या संदर्भात अश्या प्रकारची नोटीस बजावण्यात आली असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी  नीरज राजगूरू यांच्या या कार्यवामुळे गून्हेगार यांचे धांबे दणानले आहे.तसेच हे प्रस्ताव लवकरच बीड पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे अंतिम मंजूूरीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Continue Reading...

मंजूर झालेला उमापूर फाटा ते उपबाजार समीती पर्यंत रस्ता नाल्यांसह तात्काळ करावा.

मंजूर झालेला उमापूर फाटा ते उपबाजार समीती पर्यंत रस्ता नाल्यांसह तात्काळ करावा. 
वंचित नागरिकांना सोबत घेऊन रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला 

 गेवराई (प्रतिनिधी) दि.१६ तालुक्यातील मौजे उमापूर ता.गेवराई जि.बीड येथील उमापूर फाटा ते उपबाजार समीती पर्यंतचा सिमेंट कॉंक्रीट रस्ता नाल्यांसह अनेक महिन्यांपासून मंजूर आहे. मात्र मंजूर असलेला रस्ता व नाल्यांसह केला नसल्याने माटेगाव, खळेगाव, कुंभेजळगाव, भाट अंतरवली या गावांना जोडणारा हा रस्ता  पूर्णत: चिखलमय झाल्याने वाहने चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने चिखलातून सटकल्याने अनेक अपघात झाले आहेत. तसेच याच रोडवर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना पायी चालने मुश्कील झाले आहे. तर अनेक चारचाकी वाहने जात असतांना चाक पाणी साचलेल्या खड्यात गेल्यास शाळेत व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्या अंगावर चिखल पाणी उडण्याचे प्रकार रोजच होत आहे. मंजूर असलेला रस्ता तात्काळ करन्यात यावा.
 अन्यथा वंचित बहुजन आघाडी दि.२५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता लोकशाही मार्गाने उमापूर येथील नागरीकांना सोबत घेऊन गेवराई - शेवगाव रोडवरील उमापूर फाटा येथे रास्ता रोको करेल याची नोंद शासनाने घ्यावी असा ईशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची स्वाक्षरीने तहसिलदार मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग बीड, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, पोलिस अधिक्षक बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
 यावेळी तहसिलदार यांना निवेदन देतांना ज्ञानेश्वर हवाले ता. प्रसिद्धी प्रमुख, राजाभाऊ पोकळे युवा नेते,  यशवंत कापसे ग्रा.पं सदस्य, भारत हवाले, वसिम शेख, मुबारक शेख, देवेंद्र कापसे, रामदास मोरे,सुरेश गायकवाड उपस्थित होते.
Continue Reading...

Monday, July 1, 2024

गेवराई उपजिल्हा रुग्णालय सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

गेवराई उपजिल्हा रुग्णालय सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

५१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला व रक्तदान केले.

गेवराई:- भारत संघाने T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल गेवराई शहरातील क्रिकेट खेळाडू तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला होता.

या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबीराला गेवराई शहरातील माजी नगरसेवकांनी,युवा नेत्यांनी तसेच जेष्ठ पत्रकार काझी अमान तसेच बीड राज्यकर्ता संपादक अमोल वैद्य,संपादक शेख जावेद सर यांनी भेट दिली व आयोजकांची प्रशंसा केली. 

तसेच गेवराईत प्रथमच क्रिकेट सामना जिंकल्यानंतर अश्या प्रकारे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

आयोजक:- एम डी ग्रुप,रॉयल स्टार क्रिकेट क्लब,हमझा क्रिकेट क्लब,11 स्टार क्रिकेट क्लब रक्तदान शिबीर उत्तम प्रकारे आयोजित केले होते. 

रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आल्या नंतर लगेच त्याचा फायदा गेवराई येथील एक पेशंट ज्याला रक्ताची नितांत गरज होती त्याला झाला आहे याचे अर्थ रक्त दान जीवन दान हे खरे ठरले आहे. रक्त दात्यांना कळताच त्यांनी समाधान व्यक्त केले.
Continue Reading...

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023