मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Friday, January 31, 2025

वाळूतील साटेलोटे दोन पोलिसांच्या अंगलट;एक सहाय्यक फौजदार आणि एक पोलीस हवालदार निलंबनाची कारवाई.

Share it Please
वाळूतील साटेलोटे दोन पोलिसांच्या अंगलट; एक सहाय्यक फौजदार आणि एक पोलीस हवालदार निलंबनाची कारवाई.


गेवराई:-पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत  यांनी अवैध धंद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर ही काही पोलीस कर्मचारी अवैध धंद्याशी लागेबांध ठेवून आर्थिक उलाढाल करत आहेत.यात गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी वाळूत तडजोड करून आपला आर्थिक फायदा साधल्याने पोलीस अधिक्षकांनी या दोघांवर निलंबनाची कारवाई केली.त्यामुळे पुन्हा एकदा गोदापट्टा चर्चेत आला आहे.  

      पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी यापूर्वीच गोदापात्रातील तिपाले नावाच्या कर्मचाऱ्याची बदली करून आपल्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या.तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्या संदर्भात सूचना केल्या होत्या.गेवराई पोलीस ठाण्यातील बलराम सुतार (सहाय्यक फौजदार) आणि अशोक हंबर्डे (पोलीस हवालदार)या दोन कर्मचाऱ्यांनी वाळूच्या दोन टॅक्टरवर कारवाईचे आदेश असताना वाळूसह गाडी न ताब्यात घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ काढूपणा करत आरोपींना साथ देण्याचे काम केले.त्यामुळे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी थेट गुरुवारी रात्री बलराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे गोदापात्रात खळबळ उडाली.आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक न राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निलंबनाचा मोठा इशारा एसपींनी या कारवाईच्या निमित्ताने जिल्हाभर दिला आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023