मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, April 18, 2023

शिवाजीराव पंडित परिवाराच्या रोजा इफ्तार पार्टीस उत्स्फुर्त प्रतिसाद

Share it Please
शिवाजीराव पंडित परिवाराच्या रोजा इफ्तार पार्टीस उत्स्फुर्त प्रतिसाद
पवित्र रमजान निमित्त शुभेच्छांची देवाण-घेवाण व एकतेचे दर्शन
गेवराई, दि.१८ (प्रतिनिधी)  मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान निमित्ताने माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित परिवाराच्यावतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही गेवराई शहरात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गेवराई व परिसरातील मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीस मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.अत्यंत उत्साहाच्या वातावरणात हिंदु-मुस्लिम बांधवांनी या निमित्ताने पवित्र रमजानच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण केली. यावेळी माजी आ.अमरसिंह पंडित, जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवा नेते पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शिवछत्र परिवाराच्या या इफ्तार पार्टीमध्ये एकतेचे चित्र पहावयास मिळाले.
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित परिवाराच्या वतीने  दरवर्षी इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन केले जाते. मंगळवार, दि.१८ एप्रिल रोजी सायं.०६.४७ वा. छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, नगर परिषद कॉम्प्लेक्स,गेवराई येथे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीला शहर व ग्रामीण भागातील मुस्लि बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी पंडित कुटूंबियांवर प्रेम करणारे हजारो मुस्लिम बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख, व्यापारी, डॉक्टर, वकिल, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी जयभवानीचे चेअरमन अमरसिंह पंडित, जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवा नेते पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जय भवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, मोहम्मद गौसभाई, अब्दुल हन्नानसेठ, माजी सभापती कुमार ढाकणे, शेख खाजाभाई, सय्यद नजीब, मंजुर बागवान, जमील शेख, अनिसभाई, अल्ताफ कच्ची, जे. के.बाबुभाई, शेख अनिसभाई, आवेजभाई, सय्यद आबेद, मुजीब पठाण, शेख राजू, अकबर बाबा, शेख यासिन, अमजद पठाण, खलीलभाई, शम्मू पठाण, सरवर पठाण, तारेक हरबट, शेख सलीम, शेख आलीम, खालेद कुरेशी, सय्यद रियाज, वाजेद चौधरी, वसीम फारुकी, सय्यद सारेक, सुलेमान आत्तार, बाबू मोमीन, किशोर कांडेकर, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, दिपक आतकरे, आनंद दाभाडे, रवि दाभाडे, लतीफराज, मसुद टेलर, शेख मोहसीन, अनिकेत कांडेकर, शाम येवले, नवीद मशायक यांच्यासह हिंदु-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023