मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Wednesday, April 19, 2023

हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण-उत्सवातएकोप्याने राहतात याचा अभिमान वाटतो -- बदामराव पंडित

Share it Please
हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण-उत्सवात एकोप्याने राहतात याचा अभिमान वाटतो -- बदामराव पंडित 
गेवराईत इफ्तार पार्टीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

गेवराई ( प्रतिनिधि ) गेवराई मतदार संघातील हिंदू व मुस्लिम बांधवांसह सर्व समाज बांधव एकमेकांच्या सण - उत्सवांमध्ये नेहमीच एकोप्याने  सहभागी होतात. त्यासोबतच सुख-दुःखातही सहभागी होऊन एकमेकांना धीर देतात, याचा मला मनापासून अभिमान वाटतो असे गौरव उद्गार शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त केले आहेत. गेवराई येथील शिवसेना उद्धव ठाकरे गट आयोजित इफ्तार पार्टीमध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांच्या एकोप्याचे पुन्हा एकदा दर्शन झाले.
    गेवराई येेथे मुस्लिम समाजाच्या रमजान या पवित्र उपवासाच्या महिन्यानिमित्य शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दि 17 एप्रिल 2023 रोजी आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टी मध्ये हिंदू - मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून ऐक्याचे दर्शन घडवले. माझ्या गेवराई विधानसभा मतदार संघात सर्व हिंदू - मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने नांदत असून, प्रत्येकजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतो याचा मला अभिमान वाटतो. सर्व समाज बांधवांचा हा सामाजिक सलोखा कायम वाढत जावा अशी भावना शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी यावेळी व्यक्त केली.
         शहरातील नगरपरिषद शॉपिंग सेंटरच्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान निमित्य मुस्लिम बाांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. सायंकाळी झालेल्या या इफ्तार पार्टी मध्ये, शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित, युवानेते रोहित पंडित, माजी सभापती अभयसिंह पंडित यांनी उपस्थितांचे स्वागत केले. इफ्तार पार्टीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार दिनकर शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख गोविंद दाभाडे, काँग्रेस शक्ती संघटन जिल्हाध्यक्ष सय्यद शिराज, नवीद राज, शेख सुलेमानभाई, शौकतभाई सौदागर, रहीम शेठ हरभट, कैलास राठोड, शेख हबीबभाई, शेख आरेफ, शेख बद्रुद्दीन, जमीलसेठ, शेख रुस्तुम मामू, लक्ष्मण कर्डिले महाराज, युवा सेना शहर प्रमुख शेख शेहदाद, शेख सुभान, वाजेदभाई तांबोळी, शिवसेना अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तय्यब भाई पठाण, सुभाष घाडगे, शब्बू मशायक, ऍड काझी साहेब, एस वाय अन्सारी, पत्रकार शेख हरून भाई, आजम भाई पठाण, रउफ सेठ हरभट, संभाजी संभाहरे, शेख वहाब, मिलिंद वाघमारे, अंकुशराव टोनपे, पत्रकार जुनेद बागवान, शेख नवीद, हरेशसेठ मंगारमानी, शेख हकीम, शेख आवेज, शेख अल्ताफ, शेख खय्युम, शेख तय्यब, शफिक डांगे आदींसह हिंदू - मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023