इस्राईलचे राजदूत इयर इशेल व नामासार इशेल यांची बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
गेवराई ( प्रतिनिधी ) इस्राईलच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेंद्रिय पद्धतीने फुलवलेल्या केशर अंबा बागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या, इस्राईलचे राजदूत इयर इशेल आणि त्यांच्या पत्नी नामासार इशेल यांनी गेवराई येथे शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
इस्रायलच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी फुलवलेल्या फळबागांची पाहणी करण्यासाठी इस्राईलचे राजदूत इयर इशेल हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी ते गेवराई तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी आवर्जून शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत, दिल्ली येथील इजराइलचे प्रकल्प अधिकारी ब्रह्मदेव, फळ संशोधन केंद्र, छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख डॉ एम बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजदूत इयर इशेल, श्री ब्रह्मदेव, डॉ एम बी पाटील यांचा जि प चे माजी अर्थ बांधकाम सभापती युधाजित पंडित यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून तर नामासार इशेल यांचा माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या सुविधा पत्नी सौ गिरीका भाभी पंडित यांनी साडी भेट देऊन पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने सत्कार केला.
याप्रसंगी कृषी तज्ञ शाहीर साहेब, शिवसेना तालुका प्रमुख कालिदास नवले, तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, मुक्ताराम आव्हाड, काशिनाथ अडागळे, संत, स्वीय सहाय्यक पंडित पवार, प्रशासकीय अधिकारी प्रमोद देसले, व्यवस्थापक राम लामकाने आदीसह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.