महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वंचीतच्यावतीने गेवराई शहरात भव्य मोटारसायकल रॅली व रुग्णांना फळ वाटप
गेवराई / प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. एॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या अदेशावरुन गेवराई तालुक्याच्यावतिने वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने गेवराई शहरात भव्य मोटारसायकल रॅली व फळ वाटप करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या अभिवादनाला आ. लक्ष्मण पवार, शिवसेना (ठाकरे) नेते मा. मं. बदामराव पंडीत, पिआय. धनंजय फराटे, डीबीचे रामराव वाघ, सपोनी. जवंजाळ साहेब, भुतेकर साहेब, शिवसेना(ठाकरे) तालुका उपप्रमुख धर्मराज आहेर,सुनिल कांडेकर यांनी अर्जुन उपस्थीत नोंदवली होती
प्रथमत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक गेवराई येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीला सुरुवात करन्यात आली शास्त्री चौकातील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तद्नंतर तोफा, फटाक्यांची अतिषबाजी कार, रिक्षे व शेकडो मोटारसायकलसह हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, तहसिल, मोंढा, आण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने गेवराई शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅली संपन्न झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जबतक सूरज चाँद रहेंगा बाबासाहेब तुम्हारा नाम रहेंगा, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढो हम तुम्हारे साथ हैं या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तक्रार निवारण अध्यक्ष
प्रा. विष्णु जाधव, भटके विमुक्त राज्य सदस्य भिमराव महाराज चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सुदेश पोद्दार, गेवराई शहराध्यक्ष दस्तगीर शेख, रेवन गायकवाड, किशोर भोले, किशोर चव्हाण, सचिन कांडेकर,बप्पासाहेब काळे, बाळासाहेब मुळिक,सुदाम मोरे, महेश माटे, सुधाकर केदार, बप्पसाहेब शेंबडे पाटील, अजय खरात,युनुस पठाण, राजु गायकवाड, ज्ञानेश्वर हवाले, शामराव राठोड, भगवान राठोड, विशाल अडागळे, अर्यण चव्हाण, संजय शरणांगत, बाबासाहेब शरणांगत, संदिप तुरुकमारे, विशाल ठोंबरे, तोशीब शेख, बांगर, शिवराज गजभरे, कृष्णा हातागळे, सोमनाथ साळवे, अनिल साळवे, किशोर मोहिते, युवराज खरवडे, भगवान लांडगे, रामेश्वर चव्हाण, अविनाश सुरवसे,सुबोध कांडेकर, प्रतिक गायकवाड, अजय नाडे, बाजीराव बाबर, समाधान घसिंग, मिलिंद गायकवाड, नितिन पवार,किरण कांबळे, किशोर खरात,देवा चव्हाण, अकिल शेख, निजाम पठाण, सुभाष वाघसह हजारोंच्या संख्येने आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.