बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
तब्बल 3 किलोमीटर सिनेस्टाईल हा थरार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसून आला.
बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.
बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रंगलेल्या या सिनेस्टाईल थराराने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ यांचे बॉडीगार्ड अंबादास तावणे यांनी टिप्पर चालकाला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. तब्बल 3 किलोमीटर सिनेस्टाईल हा थरार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसून आला. सुदैवाने यात केवळ बॉडीगार्ड जखमी झाला. गाडी चालक आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या घटनेत बचावल्या आहेत. या प्रकारानंतर एलसीबीकडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे.
वाळूत अडकले वाहन
औरंगाबादहून बीडकडे येताना गेवराईजवळ वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या निदर्शनास आला. याच दरम्यान टिप्परवर कारवाई करण्यासाठी मुधोळ यांच्या गाडीने टिप्परला ओव्हरटेक केला. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक वाळू उपसा होत आहे. यावर महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जाते.
रात्री उशिरा पाडळसिंगी भागात जिल्हाधिकाऱ्याची गाडी आली असता मागून आलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या विनानंबर टिप्परने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या टिप्परचा काही किमी अंतरावर पाठलाग देखील केला. मात्र, टिप्पर चालकाने मागील बाजूची वाळू रस्त्यावर ओतण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर पडत असलेल्या वाळूतच जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडकली. त्या संधीचा फायदा घेत टिप्पर चालकाने भरधाव वेगात पलायन केलं.