मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Wednesday, May 17, 2023

दया कुछ तो गडबड है.....!मायबाप सरकारने हा २५,००० हजार रुपयांचा प्रस्ताव मान्य केला तर गोदाकाठच हा पट्टया श्री. सुनील केंद्रेकरांना त्यांच्या कार्यालयात ' फरशी सलाम ' करण्यासाठी हजर राहील :-अमरसिंह पंडित

Share it Please
दया कुछ तो गडबड है.....!मायबाप सरकारने हा २५,००० हजार रुपयांचा प्रस्ताव मान्य केला तर गोदाकाठच हा पट्टया श्री. सुनील केंद्रेकरांना त्यांच्या कार्यालयात ' फरशी सलाम '  करण्यासाठी हजर राहील :-अमरसिंह पंडित

आज सकाळपासून अचानकपणे इलेक्ट्रॉनिक मीडियावर विभागीय आयुक्त श्री. सुनील केंद्रेकर यांची मुलाखत प्रसारित झाली व ती मुलाखत दिवसभर एक चर्चेचा विषय ठरली.

विभागीय आयुक्त श्री. सुनील केंद्रेकर यांनी  तेलंगणा राज्याच्या धरतीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एक्करी १०,०००  रुपयाप्रमाणे पेरणीसाठी मदत करावी ' असा प्रस्ताव राज्य सरकारला दिला असल्याचे सांगितले.

सदर मुलाखत ऐकताना मला टीव्हीवर चालू असलेल्या सीआयडी मालिकेची आठवण झाली.." दया कुछ तो गडबड है...!! "

बस... आणि एक विचार मनात आला माझ्या २७ वर्षाच्या सार्वजनिक जीवनात एक उच्च पदस्थ अधिकारी अशा पद्धतीने '  सरकारला मी प्रस्ताव पाठविला आहे ' असे  जाहिररित्या माध्यमांना मुलाखत देण्याचा हा माझ्या पाहण्यातला पहिलाच प्रसंग आहे.

शेतीचा विषय असल्याकारणाने श्री. सुनिल केंद्रेकरांच्या या मुलाखतीने मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मुळात एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने जे की विभागीय आयुक्त आहेत आणि कर्तव्याचा भाग म्हणून सरकारकडे असा प्रस्ताव पाठविणे मी समजू शकतो परंतु केंद्रेकरांनी पाठवलेल्या प्रस्तावावर ते जाहीर रित्या माध्यमातून बोलतात हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ‌ मग नेमका केंद्रकरांचा बोलवता धनी कोण ? 

केंद्रेकरांच्या आडून मराठवाड्यातल्या संतप्त कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना  मदत करायची भूमिका केंद्रेकर म्हटल्याप्रमाणे त्यांची होती तर आणि तेही तेलंगणा राज्याच्या धरतीवर तर मग हात आखडून कशाला आणि कुणाच्या सूचनेवरून ?

आपण एकरी १०,०००  रुपयाचा प्रस्ताव पाठवला आणि शासनाने ५००० रुपये देण्याचे मान्य केले तर ते चुकीचे ठरेल म्हणून मागताना किमान २५,००० रुपये एक्करी प्रस्ताव मांडा. तेलंगणाच्या धरतीवर द्यायचेच असतील तर मायबाप सरकारने २५,००० रुपये तरी द्यावेत.

यदाकदाचित मायबाप सरकारने हा २५,००० हजार रुपयांचा प्रस्ताव मान्य केला तर गोदाकाठच हा पट्टया श्री. सुनील केंद्रेकरांना त्यांच्या कार्यालयात ' फरशी सलाम '  करण्यासाठी हजर राहील .

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023