मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, May 23, 2023

अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी बिनविरोध

Share it Please
अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली जयभवानी बिनविरोध
सभासद, शेतकर्‍यांच्या विश्वासाला पात्र राहील - अमरसिंह पंडित
  गेवराई (प्रतिनिधी) दि. २३ बाजार समितीच्या निवडणुकीतील एकतर्फी विजयानंतर जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे. मंगळवार दि. २३ मे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधकांकडुन एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे अखेर जयभवानीच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध संपन्न झाली आहे. शेतकरी आणि सभासदांनी विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर या माध्यमातुन शिक्कामोर्तब केले. नुतन संचालकांचे अभिनंदन होत असुन या निवडीचे तालुकाभरातुन स्वागत होत आहे. सभासद व शेतकर्‍यांच्या विश्वासाला कायम पात्र राहील असा विश्वास या निमित्ताने अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला.  
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा प्रचंड मताधिक्यांनी विजय झाला, या निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे माजी आमदार बदामराव पंडित यांनी एकत्र येवुन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या विरोधात पॅनल उभा केला होता, आजी-माजी आमदारांची युती मतदारांना भावली नाही. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर सातत्याने टिका करणारे विरोधक संचालक मंडळाच्या निवडणुकीत पॅनल उभा करुन अमरसिंह पंडित यांना टक्कर देतील अशी चर्चा तालुक्यात सुरु असतांना संचालक मंडळाच्या निवडणुक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विरोधकांना एकही अर्ज दाखल करता आला नाही. विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक अखेर बिनविरोध झाली आहे. केवळ अमरसिंह पंडित गटाचे उमेदवारी अर्ज दाखल असल्यामुळे ही निवडणुक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा प्रशासकीय पातळीवर होणे बाकी आहे. या बाबत औपचारिक घोषणा दि. ९ जुन रोजी होईल.
 जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दैठण गटामधुन माजी आमदार अमरसिंह पंडित, भाऊसाहेब नाटकर, नारायण नवले, जातेगांव गटामधुन गणपत नाटकर, साहेबराव चव्हाण, शंकरबप्पा तौर, सिरसदेवी गटामधुन जगन्नाथ शिंदे, श्रीराम आरगडे, आप्पासाहेब गव्हाणे, मादळमोही गटामधुन कुमारराव ढाकणे, राजेंद्र वारंगे, संभाजी पवळ, चकलांबा गटामधुन नंदकुमार गोरडे, डॉ. विजयकुमार घाडगे, रहेमतुल्ला पठाण, सेवा संस्था मतदार संघातुन बाबुराव काकडे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातुन भिमराव मोरे, महीला राखीव मतदार संघातुन सौ. शकुंतला संदिपान दातखीळ, सौ. संध्याताई आसाराम मराठे, इतर मागासवर्ग मतदार संघातुन जगन पाटील काळे तर भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघातुन रावसाहेब देशमुख यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एकुण २१ जागांसाठी २५ उमेदवारी अर्ज दाखल असुन हे सर्व अर्ज अमरसिंह पंडित गटाचे आहेत. छाननी प्रक्रियेनंतर दि. ८ जुन पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
 
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हा उप निबंधक समृत जधव तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक कदम आणि रामचंद्र ठोसर काम पहात आहेत. बिनविरोध निवडणुन आलेल्या संचालकांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई संपर्क कार्यालयात तोफांची सलामी देवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समर्थकांनी विजयी घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023