हजयात्रेकरुंनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा:-ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड प्रतिनिधि: दर वर्षी मुस्लीम समाजातील भाविक पवित्र हज यात्रेसाठी जिल्ह्यातून शेकडो यात्रेकरू मक्का मदीना सौदी अरेबिया येथे जातात या ही वर्षी बीड जिल्ह्यातून अनेक हज यात्री पवित्र हजला जाणार आहे, प्रत्येक हज यात्रेकरूचे वैद्यकीय तपासणी तसेच कोविड 19 लसीकरण पुर्ण होणे गरजेचे आहे, काही यात्रेकरुंनी अजून लस घेतलेली नाही, हजयात्रा काही दिवसात सुरू होणार आहे, परंतु बीड जिल्ह्यातील हज यात्रेकरूसाठी लसीकरणाची सोय करण्यात आलेली नव्हती याविषयी लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी बीड शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक मा. डॉ. साबळे साहेब यांना विनंती निवेदन करताच त्यांनी तात्काळ दि. 18 मे 2023 ला सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 वाजे पर्यंत हज यात्रे करुंसाठी मेंदु आवरण दाह प्रतिबंधात्मक लस मेनिगिटिस व्हेक्सीन व सीजनल इन्फलूंजा व्हेक्सीन लस टाेचणी कार्यक्रम विशेष कोविड-19 लसीकरण मोहिम बीड शासकीय रुग्णालयातील बाहयरुग्ण विभाग ओपीडी मध्ये ठेवण्यात आलेली आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान लोकसेना संघटनाने केलेले आहे. व हज यात्रेकरू व हज कमिटी बीड व लोकसेना संघटना डॉ. साबळे साहेबांचे सहकार्य केल्याबद्दल खुप खुप आभार मानते.