शेवगाव पोलिसांचा अजब प्रताप शांतता राखण्याचे अव्हाण करनारावरच दाखल केला दंगलीचा गुन्हा.
राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेवुन तपास सिबीआय कडे द्या.
गेवराई / प्रतिनिधी:- छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवनुकिवर दगडफेकीचा वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्यावतिने जाहिर निषेध करून प्रा. किसन चव्हाण सर वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच सदरील घटणेचे सिसिटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी तसेच हा तपास सिबीआय कडे सोपविण्यात यावा अशी मागणी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती दिनी शेवगाव जि. अहमदनगर येथे निघालेल्या मिरवणुकीवर काही समाज कंठकानी दगडफेक झाली यामुळे शेवगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री शहरभर फिरुन शांतता राखण्याचे आवाहन प्रा. किसन चव्हाण सर यांनी केले, तद्नंतर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस संरक्षण असतांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवनुकीवर दगडफेक झाली कशी, दगडफेक होत असतांना पोलिस काय करत होते असा जाब विचारल्यामुळे रात्री उशीरा प्रा. किसन चव्हाण सर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर शेवगाव पोलिसांनी दंगल घडवणे, ३०७ सारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले. या दगडफेक प्रकरणात कुठलाही सबंध नसतांना राजकिय दबावाखाली येवुन स्थानिक पोलिस प्रशासनाने कोणताही तपास न करता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रा. किसन चव्हाण सर, तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख व अन्य कार्यकर्त्यांवर दंगल घडवण्याचा प्रयत्न व ३०७ सारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
ज्या दिवशी शेवगाव शहरात दगडफेक झाली त्या दिवशी प्रा. किसन चव्हाण सर पक्षाच्या कामानिमित्त छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होते ते रात्री उशीरा शेवगाव येथे पोहचले तरी देखील कुठलाही तपास न करता केवळ सुडभावनेतुन वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दाखल केले आहेत. शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदार संघातील जनता वंचित बहुजन आघाडी सोबत जोडली गेल्यामुळे कारखानदारांपुढे तगडे आव्हान प्रा. किसन चव्हाण ठरत असल्याने स्थानिक पोलिस प्रशासनाला हताशी धरुन गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.
प्रा. किसन चव्हाण सर, शेख प्यारेलालभाई यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच या प्रकरणाचा तपास सिबीआय कडे सोपवण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने राज्यभर जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी भिमराव चव्हाण, सुदेश पोद्दार, किशोर भोले, शहर अध्यक्ष दस्तगिर शेख, अजय खरात, ज्ञानेश्वर हवाले, किशोर चव्हाणसह, सचिन कांडेकर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.