जयभवानी कडुन ऊस विकास परिसंवादाचे आयोजन
सुरेश कबाडे, पंजाब डख करणार शेतकर्यांना मार्गदर्शन
गेवराई (प्रतिनिधी) दि. ०६ जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवार दि. ८ मे रोजी सकाळी १०:३० वा. गोदावरी सभागृह, र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे ऊस विकास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली येथील सुप्रसिद्ध ऊस शेतीतज्ञ सुरेशराव कबाडे आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे मुख्य मार्गदर्शन शेतकर्यांना लाभणार आहे. कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहणार आहेत. कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक व शेतीनिष्ठ शेतकरी यांनी परिसंवादाला उपस्थित राहण्याचे आवाहन जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याने अडीच हजार मेट्रीक टन हुन पाच हजार मेट्रीक टन दैनंदिन गाळप क्षमता वाढविल्यानंतर उच्चांकी ऊसाचे गाळप केले आहे. कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊसाचे गाळप करुन ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगला ऊस दर दिल्यामुळे शेतकरी आनंदी आहे. चेअमरन अमरसिंह पंडित यांच्या पुढाकारातुन कार्यक्षेत्रात ऊस शेती विषयी नवीन तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सांगली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शेतीतज्ञ सुरेशराव कबाडे यांचे "सातत्यपुर्ण एकरी शंभर टन ऊस उत्पादन" या विषयावर तर "ऊसशेती संबंधी हवामान अंदाज" या विषयावर सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे प्रमुख मार्गदर्शन असलेल्या परिसंवादाचे आयोजन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवार दि. ८ मे २०२३ रोजी सकाळी १०:३० वा. गोदावरी सभागृह, र.भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या अध्यक्षतेखाली या ऊस विकास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक व शेतीनिष्ठ शेतकरी यांनी या परिसंवादात सहभागी होवुन एकरी शंभर टन ऊस उत्पादनाबाबतची सखोल माहिती घ्यावी असे आवाहन जयभवानी कारखान्याच्या वतीने व्हा चेअरमन जगन्नाथ शिंदे, संचालक सर्वश्री भाऊसाहेब नाटकर, भास्कर खरात, पाटीलबा मस्के, श्रीराम आरगडे, आप्पासाहेब गव्हाणे, राजेंद्र वारंगे, पांडुरंग गाडे, शेख मन्सुर, रमेशलाल जाजू, प्रकाश जगताप, नंदकिशोर गोरडे, अर्जन खेडकर, तुळशिदास औटी, शिवाजीराव कापसे, श्रीहरी लेंडाळ, साहेबराव पांढरे, सौ. संध्याताई मराठे, सौ. शकुंतलाताई दातखीळ, सुनिल पाटील, गणपतराव आरबे, जगन्नाथ दिवाण यांच्यासह जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, शेतकी अधिकारी शिंदे यांच्यासह आदींनी आवाहन केले आहे.