मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Wednesday, May 17, 2023

वावरे अंतरवाली येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या नियमबाह्य कामाची चौकशी करा - वैभव शिंगणारे

Share it Please
वावरे अंतरवाली येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या नियमबाह्य कामाची चौकशी करा - वैभव शिंगणारे


जिल्हा प्रतिनिधी  ईम्रान सौदागर:-गेवराई तालुक्याची राजधानी आसलेल्या दैठण गावाजवळील वावरेची अंतरवाली (बु) येथे सध्या जनजीवन मिशन अंतर्गत काम सुरु असून सदरील काम हे शासनाचे सर्वच अटी व शर्ती धाब्यावर बसवून अंधारी कोशिंबीर खेळ खेळल्यागत पुर्णपणे नियमबाह्य होत आहे, व त्या मध्ये खासकरून  संबधित  निगरगट्ट ठेकेदार अनेक शासन नियमाचे उलंघन करत आहे .त्यामुळे संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करा अशी मागणी निवेदनाव्दारे सामाजिक कार्यकर्ते - वैभव शिनगारे यांनी केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी आहे की, वावरेची आंतरवाली (बु.) गांवातील सध्या पाणीपुरवठा करणारी चांगल्या दर्जाची जलवाहिनी फोडली मनरेगा मधून रुपये ४० लक्ष खर्चून ५ महिन्यापूर्वी केलेल्या सिमेंट रस्ता पूर्ण फोडला त्याची भरपाई संबंधित ठेकेदार यांच्या देयाकामधून वसूल करण्यात यावी गावामध्ये मागील आदेशीत करावे.३० दिवसापून खंडित असलेल्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली जलवाहिनी भूमिगत करण्याचे काम हे नियमाप्रमाणे होत नसून ते १ ते २ फुट खोलीवर भूमिगत करण्याचे काम सुरु आहे, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते वैभव संभाजीराव शिनगारे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद,कार्यकारी अधिकारी  जिल्हा परिषद बीड,कार्यकारी अभियंता की अ. गटविकास अधिकारी, पंचायत समिती गेवराई, तहसीलदार गेवराई यासह अनेक संबंधित कार्यालयात निवेदन देऊन नियमबाह्य कामाची चौकशी करुन चौकशी अंती संबंधित ठेकेदार  दोषी आढळून आल्यास रितसर कडक कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते- वैभव शिनगारे यांनी केली आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023