क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अक्षेपार्ह लेखन
कायदेशीर कारवाई करण्याची गेवराई राष्ट्रवादी ओबीसी सेलची मागणी
गेवराई दि.२ (प्रतिनिधी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना शिक्षण मिळावे म्हणुन आपले संपुर्ण आयुष्य वेचले, शिक्षण देत आसतांना तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांनी त्यावेळेसही त्यांना त्रास देण्याचे काम केले, अगदी त्याच प्रमाणे अधुनिक काळातील मनुवादी प्रवृत्तीच्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोष्ट नामक वेबसाईट वर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक व आद्यसमाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अतिशय खालच्या पातळीवर जावुन लेखन करण्यात आलेले आहे. समाजामध्ये या दोन्ही वेबसाईट बद्दल चिड निर्माण झालेली असुन मोठ्या प्रमाणावर समाजात असंतोष निर्माण झालेला आहे.फुले-शाहु-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाईची बदनामी कदापीही सहन केली जाणार नाही. गेवराई तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या पदाधिकारी आणि समाजबांधवानीं या निच प्रवृत्तीचा तिव्र शब्दात निषेध करुन तहसिलदार, गेवराई यांना निवेदन देवुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल बदनामीकारक लेखन करुन ते इंडिक टेल्स आणि हिंदू पोष्ट नामक वेबसाईटवर टाकण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल अक्षेपार्ह लेखन करुन बदनामी करण्याच्या हेतुने ते वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहे. या लेखनामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी झाली असुन लिहाणार्या लेखकांवर आणि या प्रकाशित करणार्या वेबसाईटवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी नसता समाजबांधवाकडुन तिव्र स्वरुपाचे अंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाव्दारे नायब तहसिलदार कांबळे एल.पी., गेवराई यांना देण्यात आला आहे.
यावेळी जयभवानी कारखान्याचे संचालक जगन पटील काळे, माजी जि.प.सदस्य जालिंदर पिसाळ, बाजार समितीचे संचालक रमेश साखरे, धोंडराईच्या सरपंच कु. शितल साखरे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मदन लगड, रामप्रसाद यादव, राम म्हेत्रे, सदा वादे, बाबु जाधव, संतोष शेजुळ, कैलास मस्के, रामेश्वर राऊत, धनंजय वादे, हरीभाऊ गायकवाड, लहु राठोड, भागवत चौधरी, बद्रीनाथ पांढरे, हरिदास साखरे, राऊत डी.के, ओमप्रकाश राऊत, अरुण कातखडे, पंढरी वैद्य, कैलास गायकवाड, किशोर वादे, भागवत घोडके, संजय पुरणपोळे, कुंडलिक गायकवाड, ज्ञानेश्वर आरबड, बाबु वादे, आप्पासाहेब गायकवाड, अनिल गोरे, कृष्णकुमार केरुळकर, राधेशाम लेंडाळ आदी समाजबांधव उपस्थित होते.