मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, June 27, 2023

बोरगावथडी गोदावरी नदीच्या पात्रातून केणीच्या सह्याने अवैध वाळू उपसा जोरात सुरू

Share it Please
बोरगावथडी गोदावरी नदीच्या पात्रातून केणीच्या सह्याने अवैध वाळू उपसा जोरात सुरू
गेवराई तालुक्यात कारवाईचा धडाका: परंतु बोरगावथडी, गंगावाडी मसुबा कडे महसुलचे अर्थपुर्ण दुर्लक्ष

तलवाडा  प्रतिनिधी इम्रान सौदागर:-गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात बोरगावथडी, गंगावाडी मसुबा,येथील गोदावरीच्या नदीपात्रातून पुन्हा मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा केणीच्या साह्याने केला जात आहे. यामुळे अक्षरशः नदीपात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून ते ग्रामस्थांसाठी जीवघेणे ठरणार आहे. शासनातर्फे वाळू लिलाव बंद असतांना देखील वाळू माफियांतर्फे सुरू असलेल्या या अवैध उपशाकडे स्थानिक महसुल, यंत्रणेने हेतुपुरस्पर अर्थपुर्ण दुर्लक्ष केले आहे. याप्रश्नी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून वाळू उपसा थांबवावा, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा लोकांनी दबक्या आवाजात चर्चा द्वारे दिला आहे. गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी गेवराई तालुक्यातील अनेक गांवात कारवाई चा धडाका लावला असुन बोरगावथडी, गंगावाडी मसुबा कडे का जाणुन बुजून दुर्लक्ष केले हा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाळू उपशाकडे लक्ष वेधले. यावेळी तलवाडा परिसरात  बोरगावथडी गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा चोरट्यांतर्फे सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. रात्रीचा दिवस करत ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनातून नदीपात्रातून उपसा करत वाळू लांबवली जात आहे. यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईशी ग्रामस्थांना सामना करावा लागणार आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी होणारे खड्डे जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.बोरगावथडी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या या वाळू चोरी संदर्भात महसुल  विभागने वाळू माफियांविरूध्द एक महिना पुवी दिड  कोटीची कारवाई केली परंतु  पुना वाळुमाफियांनी डोके  वर काढल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे असलेले लागेबांधे दिसून येत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. गोदावरी पात्रातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वाळू उपशामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू चोरीमुळे माफियांचे फावले आहे. तर शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. याची दखल घेत त्वरीत वाळू चोरट्यांविरूध्द कारवाई करावी, गावकरी आंदोलन करण्यात येणार आहे असे समजते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023