मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Wednesday, July 5, 2023

गेवराईच्या उप अधीक्षकांची मोठी कामगिरी;सात दिवसांत ८० लाखांचा मुद्देमाल जप्त

Share it Please
गेवराईच्या उप अधीक्षकांची मोठी कामगिरी;सात दिवसांत ८० लाखांचा मुद्देमाल जप्त 
गेवराई आणि चकलांबा ठाण्याअंतर्गत कायवाई 

गेवराई दि ५ ( वार्ताहार )  अवैध धंदे करणा-यांना गेवराई येथील पोलिस उपअधीक्षक  निरज राजगुरु यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. नव्याने रजू होताच एक महिण्याच्या दरम्यान  अवैध वाळू वाहतुक करणा-या सह दारु ,राशनची माफिया गिरी करणाऱ्यां वर ८ वेगवेगळ्या कारवाईत तब्बल ८१ लाखाचे मुद्देमाल जप्त करुन गेवराई वचकलंबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करत मोठी चपराक दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की ,गेवराई उपविभागात नवीन पोलिस  उपअधिक्षक  निरज राजगुरु यांनी पदभार  हाती  घेतल्या पासुन अवैध धंद्यावर  कारवाईचा धडाका सुरु केला असून गेवराई तालुक्यातील विविध भागात जाऊन दारु,राषन,अवैध वाळु वाहतुकी विरुद्ध रणशिंग फुकुन  कारवाईचा सपाटा लावला आहे.या दरम्यान ६ ठिकाणी अवैध वाळू वाहतुक करणारे वाहन जप्त करण्यात आले तर अवैध राषन व दारु विक्री करणाऱ्या वर ही कारवाई करुन तब्बल ८१ लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करुन गेवराई चकलंबा पोलिस ठाण्यात आठ विविध  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाई मुळे  अवैध धंदे करणाऱ्याचे धांबे दणाणले आहे.तर माझ्या उपविभागात अवैध दारु ,राशन,मटका,वाळु या दोन नंबरचे धंदे कराल तर कोणाची ही गैय केली जाणार नसून थेट कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येतील असा सज्जड दम अवैध धंदे करणाऱ्या माफियांना पोलिस उप अधीक्षक निरज राजगुरु यांनी दिला असून या  आठ विविध ठिकाणी झालेल्या  कारवाईत पोहे,अशोक तिपाले,श्रीनिवास चनेबोईनवाड,प्रविण कुडके यांचा सहभाग होता.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023