मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Wednesday, July 12, 2023

औरंगाबाद विभागीय अधिस्विकृती समितीवर अनिल महाजन यांची निवड.

Share it Please
औरंगाबाद विभागीय अधिस्विकृती समितीवर अनिल महाजन यांची निवड.
किल्लेधारुर दि.११(वार्ताहर) प्रसार माध्यमाशी संबंधित व्यक्तींना अधिस्विकृती देण्यासंबंधी असलेल्या औरंगाबाद विभागीय समितीवर किल्लेधारुर येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल महाजन यांची राज्य शासनाच्या वतीने निवड करण्यात आली आहे.  शासनाच्या विभागीय अधिस्विकृती समितीवर महाजन यांच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.
 दि.११ जुलै मंगळवार रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यात महाराष्ट्रातील राज्य अधिस्विकृती समिती व विभागीय अधिस्विकृती समिती सदस्यांची घोषणा करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेच्या  राज्याचे जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांची औरंगाबाद विभागीय समितीवर निवड करण्यात आली. अनिल महाजन हे गेली तीस वर्ष पत्रकारितेत असून सामाजिक कार्यातही त्यांचे विशेष कार्य आहे. त्यांच्या निवडीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, मेडीया प्रमुख अनिल वाघमारे आदीनी अभिनंदन केले आहे. धारुर येथुन प्रथमच विभागीय शासकीय समितीवर महाजन यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023