ऊर्दू विकास फाऊंडेशनतर्फे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी सुमेर शेख :-भारतीय ऊर्दू विकास फाऊंडेशन व अब्दुल कादिर फारुकी साहित्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉ अब्दुल कादिर फारुकी साहित्य सेवा पुरस्कार प्रदान तसेच मुशायरा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम जेष्ठ साहित्यिक डॉ आरजु राजस्थानी यांच्या अध्यक्षतेखाली मुहिबबे ऊर्दू हॉल येथे संपन्न झाला.
शिक्षक कवि नदीम मिर्झा प्रसिद्ध लघु कथालेखक अरशद सिधिकी आणि ऊर्दू व मराठी चे पत्रकार अय्युब नालामंदु यांना सन्मानित करण्यात आले, ऊर्दू फाऊंडेशन अध्यक्ष सुलतान अख्तर यांना सन्मानित करण्यात आले महमद इलियास सर काजी मुजीब मुख्तार कांटरेकटर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रिजवान नाथापुरी सुबहान, वासिक, अजीम, महमद अली बागे शमीम मिर्झा प्राचार्य रिजवान खान महमद इलियास सर यांनी आपल्या कविता वाचून कार्यक्रमात रंगत आणली गुलाम साकिब यांनी अत्यंत सुंदर पध्दतीने सुत्र संचलन केले शेवटी उपस्थित पाहुणे व सगळ्यांनचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली