शिक्षण विभागातील दलाल 'गब्बर'पण त्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
बोगस शिक्षकांवर सायबर पोलीस ठाणे मार्फत गु.र.नं.५८/२०२१ अन्वये गुन्हा दाखल झाला
बीड / प्रतिनिधी
राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ मध्ये झालेल्या बोगसगिरीच्या प्रकरणात बीड जिल्हयातुन ६९ भावी बोगस शिक्षकांवर सायबर पोलीस ठाणे मार्फत गु.र.नं.५८/२०२१ अन्वये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली पण एवढ्या मोठया गैरव्यवहाराच्या प्रकरणात बीड जिल्ह्यातुन अद्याप एकही आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली नसुन त्याचप्रमाणे एकही दलालावर कायदेशीवर कार्यवाही करून गुन्हे दाखल झालेले नाहीत. अथवा एकही दलाल व्यक्तीची साधी चौकशी सुध्दा करण्यात आलेली नाही. या गैरव्यवहाराच्या प्रकरणात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आणि चौकशी करणाऱ्या यंत्रणेकरून दलालांची नावे दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शिक्षक पात्रता परिषद २०१८ मध्ये राज्यभरात २५०० हजार वर शिक्षक पात्रता देत असलेल्या बोगस शिक्षकांनी बोगसगिरी केल्याचे प्रकार समोर आले. ज्यात बीड जिल्हयात सुरूवातीला १५० बोगसधारकांची नावे समोर आली होती. सदरील प्रकार हा बीड जिल्हयातील शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारा होता. यामध्ये एकूण ६९ बोगस शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. या शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्र पडताळण्याचे आदेश दि. २० जुन २०२३ रोजी आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिलेले होते. यानुसार ६९ शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार या सदरील शिकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु अद्यापपर्यंत एकाही शिक्षकांवर कार्यवाही झालेली नाही. यामधील ७३ बोगस प्रमाणपत्र धारकांची सेवा समाप्तीचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी संबंधीत संस्थांना दिलेले आहेत. परंतु या आदेशाला संस्थांचालकांनी केराची टोपली दाखवली आहे. आदेशातील एकाही शिक्षकांवर अद्यापपर्यंत सेवासमाप्तीची कारवाई झालेली नोंद जिल्हा परिषदेत झालेली नाही किंवा तसा अहवाल संस्थांकडून प्राप्त झालेला नाही. या संबंधीत आम्ही शिक्षणाधिकारी यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, दलालांवर कार्यवाही करणे तो अधिकार आम्हाला नाही ते पोलीस यंत्रणेचे काम आहे.
‘ते’ शिक्षक न्यायालयात पण आमचे आदशे कायम - तुकाराम पवार
सायबर पोलीस ठाणे मार्फत बीड जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार केलेल्या ६९ उमेदवारांवर गुन्हे दाखल झाले आहे सदरील प्रकरणात अद्याप एक ही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. न सदरील प्रकरणातील ७३ आम्ही सेवा समितीचे आदेश संबंधित शाळांना पाठविले होते त्यानुसार आम्ही २८ जून रोजी जिल्हा परिषद मुख्य इमारतीच्या हॉलमध्ये बैठक घेऊन संबंधित शाळेचे संस्थाचालक, प्राचार्य आणि गैरव्यवहारातील आरोपी शिक्षकांची बैठक घेऊन सेवा समाप्तीच्या आदेशाची माहिती दिली ज्यात गैरव्यवहारातील दोषी शिक्षकांनी नैसर्गिक तत्त्वावर माफी देण्याची मागणी मांडली होती व त्यातील काही शिक्षकांनी हायकोर्टात अपील केल्याची माहिती मिळाली. गैरव्यवहारातील दोषी शिक्षकांचे सेवा समाप्तीचे आदेश कायम आहे अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार यांनी दिली.