मणिपूर घटनेचा गेवराई शहरात उद्या निषेध करून तहसीलदारांना निवेदन देणार
ॲड. सुभाष निकम यांच्या निवासस्थानी गेवराई शहरातील प्रमुख जाणकार कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
गेवराई- दि. 23 (प्रतिनिधी) मणिपूर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या निर्दयी अत्याचाराच्या घटने संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आज दिनांक 23 जुलै रोजी ॲड. सुभाष निकम यांच्या निवासस्थानी गेवराई शहरातील प्रमुख जाणकार कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये मणिपुर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात दिनांक 24 जुलै 2023 रोजी गेवराई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी 10:00 वाजता शहरातील सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक काळ्या रिबीन बांधून या घटनेचा निषेध करत शांततामय मार्गाने तहसील कार्यालयावर जाऊन शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देणार आहेत. या निवेदनामध्ये मणिपूरच्या क्रूर घटनेमुळे भारतीय संविधानासमोर जे आव्हान निर्माण झाले आहे त्याचा सामना करून संविधानिक मूल्य बळकट करण्यासाठी आणि अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे या पद्धतीच्या मागण्या या निवेदनामध्ये करण्यात येणार आहेत.
सुभाष निकम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय संघटनेचे पताधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक कृतज्ञेतेच्या जाणिवेतून गेवराई शहरांमध्ये होत असलेल्या या कार्यक्रमामध्ये शहरातील सर्वसामाजिक संस्था, संघटना, आणि राजकीय प्रतिनिधींनी तसेच शहरातील सुज्ञ नागरिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आयोजकाच्या वतीने ॲड. सुभाष निकम यांनी आवाहन करण्यात आले आहे.