जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून मंडळ अधिकारी अजय मोराळे आणि परमेश्वर सानप वाळू माफियांचे दलाल बनले.
3 लाखाची तोड पाणी करून खिसे गरम केले.
गोदावरीची वाळू चोरणाऱ्या चोरांच्या वाहनावर गुन्हे दाखल न करता त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून त्यांना आर्थिक चटके देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपाताई मुधूळ मॅडमचे असताना त्यांच्याच महसूल विभागातील गेवराई येथे कार्यरत मंडळ अधिकारी अजय मोहाळ व परमेश्वर सानप यांनी गुन्हे दाखल करून आम्ही वाळू माफियांचे दलाल आहोत हे दाखवून दिले.या प्रकरणात वाळू माफिया कडून मोहाले आणि सानप यांनी 3 लाख रुपयांची तोड पाणी करून आपले खिसे गरम केल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान कुमावत यांनी ठळक पने वाळू माफियांचे नाव गावआणि जप्त केलेल्या वाहनाची नंबर देवून ही अज्ञात व्यक्ती म्हणून पोलिसात नोंद केल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे वरिष्ठांच्या आदेशाला ही कचरा कुंडी दाखवण्याचे धाडस कर्मचाऱ्यात कसे येते हाच प्रश्न जनतेला पडला आहे.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन वाळू घाट म्हणून सू परिचित आहे.याच पवित्र क्षेत्रात शनी देवाच्या पायथ्याशी गोदावरीच्या पात्रात काही चोर रोजच वाळू चोरी करतात आणि लाखो रुपये कमावतात.त्यांना पोलीस आणि महसूल कर्मचारी मदत करतात पण अचानक त्यांच्यावर शनिदेव कोपला आणि अचानक अवैध धंद्याचा कर्दनकाळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि जोडीला प्रशिक्षित जिल्हाधिकारी जीवने हे आपल्या ताफ्यासह तिथे पोहचले आणि त्यांनी वाळू चोरीचे साहित्य होटर,2 जे सी बी 2 हैयवा टिप्पर सहित लोकेशन वरती असणारी वाहने आणि काही तरुण जागेवर पकडली आणि चकलंबा ठाण्यात वाहने लावून दुसरी कार्यवाही करण्यासाठी पुढे निघून गेले.
दुसऱ्या दिवशी पोलीस अधिकारी कुमावत यांनी स्वःता चौकशी करून चकलांबा ठाण्यात वाळू चोरीचे साहित्य हे कोणाच्या नावावर आहे याची खातर जमा करून कुमावत यांनी वाळू चोरांच्या नावा सहीत वाहन मालक हयवा टिप्पर चालक सुनील उद्धव कांगने रा वाघाळा जिल्हा जालना,व हायवा टिप्परचे मालक सोलापूर येथील अर्थ मुवर्स चे मांजरे पाटील आणि लोडर चे मालक संतोष अंकुश नाटकर रा.राक्षस भुवन गेवराई असे नाव देवून त्यानी दिनांक 9 जून 2023 रोजी सविस्तर पत्र देवून माजलगावाहून दोन पोलिस कर्मचारी यांना पाठवून चकलंबा पोलीस प्रमुखांना दिले.आणि रितसर नावा सहीत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.परंतु चकलांबा पोलिसांनी त्यांचे आदेश न मानता तहसील कार्याल्यास पत्र देवून या बाबत तक्रार देण्याचे पत्राद्वारे सांगितले. दरम्यान वाळू माफिया आणि मंडळ अधिकारी मोहाले, सानप यांच्यात डिल झाली त्यांनी तहसीलदार खोमणे यांना पटवले आणि इथेच वाळू माफियांची दलाली करत मोहाले यांनी संबंधित वाहनावर आणि अज्ञात लोकावर गुन्हा दाखल करण्याची फिर्याद दिनांक 10 जून 2023 रोजी चकलंबा पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांना सर्व माहीत असून ही त्यांनी मोहाळ यांनी सांगितल्या प्रमाणे केवळ गुन्हे दाखल केले.वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशा नुसार दंडात्मक कारवाई केली असती तर जवळपास 29 लाख रुपये शासन दरबारी जमा झाले असते आणि वाळू माफियांना ही चाप बसला असता.आता हे पैसे मंडळ अधिकारी मोहाले व सानप यांच्या कडून वसूल करण्यात यावे अशी रास्त मागणी केली जात आहे.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून गोदावरीची चाळणी करत वाळू माफिया हजारो ब्रास वाळू चोरी करत आहे या वाळू चोरांना लगाम घालण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही खालचे कर्मचारी जुमानत नाहीत हे या घटने वरून दिसून येते.तलाठी मंडळ अधिकारी आणि पोलीस हे कसे वाळू माफियांचे दलाल बनले आहेत हे सर्वांना कळून चुकले आहेत.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सांगून ही पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून ही मंडळ अधिकाऱ्यांनी दंडात्मक नव्हे तर गुन्हा दाखल केल्याने या अधिकाऱ्यांची किंमत किती हे दिसते.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश डावलणाऱ्या मोहाले आणि सानप यांच्यावर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.