मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, July 29, 2023

ऐतिहासिक मोगलानी मस्जिद पुन्हा त्याच जागेवर तमिर करा - सय्यद सलीम बापू

Share it Please
ऐतिहासिक मोगलानी मस्जिद पुन्हा त्याच जागेवर तमिर करा - सय्यद सलीम बापू
धारूर तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण

धारूर / प्रतिनिधी
धारूर तालुक्यातील ऐतिहासिक मोगलानी मस्जिद ची तमिर पुन्हा त्याच जागेवर करून सर्व्हे नं.५५६,६१० च्या मालकी रकान्यात मोगलानी मस्जिद चे नाव लावून तात्काळ अनाधिकृत अतिक्रमणे हटवा या मागणीसाठी आज धारूर तहसील कार्यालय समोर आंबेडकरी विचार मोर्चा,आंबेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आले.
         असे की, धारूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ कार्यालय
अंतर्गत येणारे अनेक धार्मिक स्थळ आहे यातीलच एक शहरातील मोगलानी मस्जिद आहे. पण गेल्या काही वर्षापासून येथील भू माफिया, स्वयंघोषित नेते मंडळींनी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत अतिक्रमणे करून मस्जिद चे अस्तित्व नाष्टकेले आहे. याप्रकरणी आंबेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळी निवेदने देऊन देखील अद्याप कसलीही कार्यवाही न झाल्याने आज धारूर तहसील कार्यालय समोर सय्यद सलीम बापू यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चाचे असंख्य कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण करण्यात आले. 
     धारूर येथील सर्व्हे नं.५५६ व ६१० मध्ये ऐतिहासिक मस्जीद मोगलानी ही होती परंतू ती सध्या तेथे नाही. तेथे अवैधरित्या बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी मस्जीद होती त्याच ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे मोगलानी मस्जीद तामीर करता आली नाही. वरील मोगलानी मस्जीद बाबत नमुना नं.९, खासरा पाहणी व इतर महसूल अभिलेखात याचा उल्लेख आहे. परंतू धारूर येथील काही भूमाफीया व राजकरणी लोकांनी आपसात संगनमत करून वरील मस्जीदचे अस्तित्व नष्ट करून सदरील जागेवर अतिक्रमण केलेले आहे. यापूर्वी मा. जिल्हा वक्फ अधिकारी साहेब, जिल्हा वक्फ कार्यालय, बीड यांना दि.१३ जून २०२३ रोजी निवेदन दिले होते त्या निवेदनाआधारे मा. जिल्हा वक्फ अधिकारी बीड यांनी आपणास दि.१३ जून २०२३ रोजी पत्र काढले व वरील मस्जीदबाबतचे सर्व कागदपत्रांची मागणी केली. तसेच निवेदकाने यापूर्वी दि.०८ जून २०२३ रोजी मोगलानी मस्जीद तमिर करावी या बाबत निवेदन दिले होते.त्यानुसार  तहसिलदार श्री. काळे साहेब यांनी याबाबत तात्काळ चौकशी करणे बाबत आदेश दिले होते. तसेच आपले महसुल कर्मचारी श्री. कपील यांना वरील मिळकतीबाबत सुनावणी लावणे बाबत सांगितले होते व निवेदकास दि.२१/०७/ २०२३ तारीख सुनावणी बाबत दिली होती परंतू अद्यापपर्यंत वरील मिळकतीबाबत सुनावणी लावण्यात आलेली नाही.तरी वरील प्रकरणी प्रशासन अनधिकृत अतिक्रमण धारकांवर कसलीही कार्यवाही होत नसल्याने नाईलाज आम्ही धारूर तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण करत आहोत असे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सय्यद सलीम बापू म्हणाले यावेळी एडवोकेट सय्यद अल्ताफ,शेख इलियास,शेख महमूद,शेख बाबा आंबेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चा चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023