मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Thursday, July 13, 2023

गेवराई:- गोदापात्रातून होणाऱ्या अवैध वाळु उपसा विरुद्ध गेवराई उपविभागीय अधिकारी यांच्या पथका मार्फत धडक कार्यवाही.

Share it Please
गेवराई:- गोदापात्रातून होणाऱ्या अवैध वाळु उपसा विरुद्ध गेवराई उपविभागीय अधिकारी यांच्या पथका मार्फत धडक कार्यवाही.
गेवराई प्रतिनिधी: - तालुक्यातील गोदापात्रातून होणा-या अवैध वाळु उपसा विरुद्ध गेवराई उपविभागीय अधिकारी यांच्या पथका मार्फत धडक कार्यवाही.
या कार्यवाही दोन टैक्टर सह केनी वाळु साठा जप्त करुन वाळु चोरांना दणका देण्यात आल आहे.

दहा लाखाचा मुद्देमाल जप्त वाळू माफियाचे धाबे दणाणले.

याबाबत अधिक माहिती अशी की गेवराई येथील उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु यांनी अवैध धंदे करणा-यांवर धडक मोहिम सुरु केलेली असून त्यानुसार दि.१३ रोजी गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदापात्रात अवैध वाळू उतखन्न होऊन वाळु वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने निरज राजगुरु यांनी त्यांच्या पथकातील पोहेकॉ अशोक तिपाले ,खटाने ,पवळ,सुरवसे यांना पाठवून गोदापात्रातून अवैध उतखन्न करत असतांना रंगेहाथ दोन टैक्टर केनी सह वाळु साठा जप्त करत धडाकेबाज कारवाई केली आहे.डिवायएसपी राजगुरु हे स्वता जाऊन थेट कारवाई करु लागल्याने अवैध धंदे करणा-याचे धांबे दणाणले आहे. तर या प्रकरणी पुढील कारवाईसाठी चकलंबा पोलिस ठाण्यात जप्त वाहने लावण्यात आली आहे.




18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023