गेवराई :-ऑल इंडिया मोमीन कॉन्फ्रैंस मोमीन समाज तालुका अध्यक्ष पद नगरसेवक मोमीन मोअज्जम अक्रम ( मुन्ना सेठ ) निवड झाल्याबद्दल
गेवराई:- आज गेवराई ऑल इंडिया मोमीन कॉन्फ्रैंस छोटेखानी कार्यक्रमात गेवराई तालुका अध्यक्ष ची निवळ करण्यात आली ऑल इंडिया मोमीन कॉन्फ्रैंस मोमीन समाज तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते मोमीन मोअजम्म (माजी नगर सेवक) यांची निवड झाली.
मोमीन मोअजम्म (माजी नगर सेवक) हे नगर सेवक असताना वंचित मुस्लिम समाजातील गरीब जनतेचे कामे निस्वार्थपणे करत होते ते मुस्लिम समाजासाठी अहोरात्र लढत आहे सर्वांच्या सुखदुःखात काम करण्याची क्षमता त्याच्यात आहे याचीच दखल घेत ऑल इंडिया मोमीन कॉन्फ्रैंस ने त्यांना त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व त्यांना तालुका अध्यक्ष पदी निवड केली.
मागास मोमीन यांच्या हक्काचा आवाज ऑल इंडिया मोमीन कॉन्फ्रैंस याच व्यासपीठावरून तालुक्यात बुलंद करून ऑल इंडिया मोमीन कॉन्फ्रैंस चे काम तळागाळातील जनतेच्या समोर घेऊन जाईल असे मोमीन मोअजम्म यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगीतले
मोमीन मोअजम्म यांनी यावेळी आपल्या मनोगतात आठवण करून दिली की 2004 मध्ये मोमीन कॉन्फरन्सने केलेल्या जोरदार आंदोलनामुळे उर्दूला राज्यात दुसऱ्या राजभाषेचा दर्जा मिळाला.
या वेळी व्यासपीठावर ऑल इंडिया मोमीन कॉन्फ्रैंस राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट फिरोज अहमद अन्सारी सुप्रीम कोर्ट दिल्ली, महाराष्ट्र अध्यक्ष अब्दुल मतीन परवेज मोमीन ,बीड जिल्हा अध्यक्ष मोहम्मद सादिक मोमीन, मोमीन सलाम, मोमीन मुस्तकीन, अब्दुल रहीम ढोराज,मोमिन आजम सेठ, माजी नगरसेवक जान मोहम्मद बागवान,माजी नगरसेवक फिरोज अहमद, जमील पठाण सर ,सय्यद बदियोदिन, इम्रान पठाण ,अहमद भाई, बबलू भाई अब्दुल राऊफ, समीर मोमीन, सोहेल मोमीन ,खलील बागवान उपस्थित होते.