दाजीने मेहुण्याच्या पोटात चाकू खुपसला ;युवकांची प्रकृती चिंताजनक आहे
गेवराई शहरात कायदा व सुव्यस्थेचे धिंदवडे.
गेवराई 17 ( वार्ताहार ) शहरातील संजय नगर भागातील राहणाऱ्या एका बाविस वर्षिय युवकावर आपल्याच बहिणीच्या नवऱ्याने बोलावून चाकू खूपसला असल्याची घटना (दि 16 ऑगस्ट ) च्या दहाच्या सुमारास शहरातील तय्यबनगर भागात घडली असुन सदर घटनेमुळे गेवराई शहरात कायदा व सुव्यस्थेचे धिंदवडे उडाले आहेत .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , सय्यद सलमान सय्यद गफूर ( वय 22 वर्ष ) राहणार संजय नगर गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड असे या गंभीररीत्या जखमी झालेल्या युवकांचे नाव असुन या युवकाला आपल्या बहिणीचा पती याने फोन करून गेवराई शहरातील तो राहत असलेल्या तय्यब नगर याठिकाणी बोलावले व तो दारूच्या नशेत असतांना त्याला शिवीगाळ करू लागला शिवी देण्यास विरोध केल्याने त्याने आपल्या जवळ असलेल्या तिश्न हत्याराने पोटात खूपसले तसेच या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ गून्हा दाखल केला आहे परंतू त्यामध्ये आर्म एक्टचे कलम लावले नाही अश्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पोलिस कलम लावण्यास कसे चुकले ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे सदरच्या युवकाला मोठ्या प्रमाणात चाकू पोटात गेला असल्याने त्याच्यावर बीड येथील जिल्हा रूग्णालयात 120 टाक्याची सर्जरी करण्यात आली असुन या युवकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे मात्र गून्हा दाखल होऊन एक दिवस लोटला तरी गेवराई पोलिसांनी आरोपी अद्याप आरोपी अटक केला नाही सदरच्या घटनेमुळे गेवराई शहरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्णाण झाली आहे तसेच या प्रकरणी युवकांचा भाऊ यांच्या फिर्यादीवरून करीम शेख रूस्तूम राहणार गेवराई याच्या विरूद्ध गून्हा दाखल केला असुन पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत .