पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर पणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत
अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांना निवेदन - डॉ.गणेश ढवळे
बीड / प्रतिनिधी :-पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर पणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ होत असुन ही बाब चिंताजनक असुन पाचोरा येथील पत्रकार संदिप महाजन यांनी विरोधात बातमी लावल्याने आ.किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार संदिप महाजन यांना फोनवरून शिवीगाळ केली होती याची ध्वनी फीत प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाली होती.
याचाच राग मनात धरून गुंडाकडुन भर रस्त्यावर लाथा बुक्कायांनी मारहाण केली याचीही चित्रफीत सोशल मिडिया तसेच प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झाली असुन हा हल्ला प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असुन संबंधित प्रकरणात पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, मिलिंद सरपते, शेख मुबीन, बलभीम उबाळे यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद यांना दिले आहे.
![]() |
सोमवारी आंदोलन
पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक २०१७ मध्ये मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली.२०१८ मध्ये महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला.असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.मात्र या पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर पणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यात वाढ होत आहे त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी व पत्रकार संदिप महाजन यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी दि.१४ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.