गेवराई येथील मनोहर पुंड खून प्रकरणातील आरोपी कुख्यात गूंड यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली
गेवराई प्रतिनिधी: गेवराई येथील मनोहर पुंड खून प्रकरणातील आरोपी कुख्यात गूंड माऊली आनंद बाप्ते यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याने या खून प्रकरणातील तपासाची चक्रे फिरवून या गुन्हाचा उलगडा होणार असून अजून फरार असलेल्या तिघांना ताब्यात घेण्यासाठी विविध पथक आरोपींच्या शोध साठी पाठवण्यात आले आहे.
गेवराई शहरातील रंगार चौक भागात राहणा-या मनोहर पुंड या हा तरुण व्यसनधीन झाला होता.म्हणुन याला अदल धडावी यासाठी त्याच्या भावाने त्यास मारहाण करण्यासाठी कुख्यात गूंड माऊली आनंद बाप्ते यास सांगून मनोहर यास मन्यारवाडी रोड लगत असलेल्या महेंद्र सांवत यांच्या शेतात नेहून बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्यांचा मुत्यु झाल्याने मारेकरी घटना स्थळी खून करुन मृतदेह तेथेच फेकून पसार झाले मात्र गेवराई पोलिसांनी मृताच्या भावाला खाकीचा धसका दाखवताच त्याने घटनेची सत्यता पोलिसा समोर मांडली असता सदरिल खून कुख्यात गुंडा माऊली बाप्ते सह त्याच्या तिघा साथीदाराने केले असून या प्रकरणी खून करुन माऊली हा फारार झाला होता.त्यास बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक साबळे यांच्या पथकाने शोध धेवून वाशिम येथून अटक करत गेवराई पोलिसांच्या स्वाधिन केले असून या प्रकरणी पुढील तपास गेवराई पोलिस करत आहे.
खूनातील आरोपी माऊली वर पोलीस मेहरबान का?
कुख्यात गुंड माऊली याने खून केला या देखील अनेक गुन्हे दाखल झाले मात्र तो गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच तो कसा काय सुटतो ? सराईत गुन्हेगार माऊली बाप्ते याच्यावर खून,खुनाचा प्रयत्न,चोरी,दरोड्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असतांना सुद्धा तो मोकाट शहरात फिरताना दिसतो. या गुंडामागे राजकीय व्यक्तीचे पाठबळ असल्याने पोलिसांची भूमिका नेहमीच संशयास्पद असते. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याकडे तपास आहे त्याच अधिकाऱ्याकडे यापूर्वी या गुंडाच्या अनेक केसेस चा तपास सोपवला गेला परंतू अवघ्या काही दिवसात तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांनी वेळीच कठोर भूमिका घेतली असती तर कालचा प्रकार टळला असता अशी चर्चा शहरात ऐकण्यास मिळत आहे.
मन्यारवाडी रोड लगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये कुख्यात गूंड माऊली बाप्ते हा पत्याचे कल्ब चालवत असल्याचे सुत्राची माहिती असून या पत्र्याच्या शेड मध्ये सुपारी घेवून हा माऊली बाप्ते टोळीतील साथीदाराच्या मदतीने लोकांना मारहाण करत असल्याचे बोलले जात आहे.या मध्ये या पुर्वी सदरिल शेती मालक सुद्धा एका गुन्हा मध्ये आरोपी असल्याचे सागितले जात असून पोलिसांनी या प्रकरणी कसुन चौकशी करने गरजेचे आहे.