अन्नभेसळ अधिकारी यांची बोगस गिरी;गुटखा माफियांना कॉल करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशीची मागणी
गेवराई / प्रतिनिधी: अन्नभेसळ अधिकारी यांच्या गेवराई तालुक्यात संशयाद पद हालचाली होत आहे. गुटखा माफियांसह इतर बेसळ करणा-या लोकांना सोबत घेवून फिरु लागले असल्याने हा काय गोल माल सुरु आहे. यावर गेवराईत चर्चा होत असून अन्नभेसळ अधिकारी सत्त गुटखा माफियांना वॉटस्प कॉल च्या माध्यमातून संपर्क करुन करतात तरी काय हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यावर विभागीय सत्तरावरील अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन करुन अन्नभेसळ विभागाची बोगस गिरी थांबवावी अशी मागणी होऊ लागली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एक अन्नभेसळ अधिकारी पगार पेक्षा जास्त खर्चा खाजगी वाहनांच्या भाड्यात घालत आहे. दरम्यान दिवसभर बीड जिल्हातील गेवराई सह आष्टी या भागात जाण्यासाठी वाहने उपलब्ध कोठून होते. या वाहनाना कोणत्या गुटखा माफियांनी पैसा पुरवला याची चौकशी होणे गरजेचे असून नासिक येथे बीड हून जायचे असल्यास साधारण ७ हजार रुपये भाडे लागते दर आठवड्यात ऐवडे पैसे कोणाचे खर्च होते. गेवराई येथे सत्त चकरा मारून कारवाई तर कोणावर होत नाही मंग दौरे कशा साठी ?
गेवराईत अन्नभेसळ अधिकारी गुटखा माफियासह इतर भेसळ करणा-या माफियांना वॉटस्प कॉल करुन का संपर्क करतात ? त्यांच्याशी त्यांचे काय बोलने होते. यावर गेवराईत जोरदार चर्चा होत असून यामुळे अन्नभेसळ विभागाची बदनामी होत असून अन्नभेसळ विभागाच्या वरिष्ट अधिका-यांनी चौकशी समिती स्थापन करुन अन्नभेसळ च्या भ्रष्ट अधिकारीचे फोन कॉल तपासून सखोल चौकशी करुन होणारी बोगस गिरी उजेडात आणुन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.