संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य पदी सौ. वर्षा संदिपान घूंबार्डे यांची निवड
गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सौ. वर्षा संदिपान घुंबार्डे यांची महिला अशासकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योगदानाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याकरिता शासन निर्णयाच्या अनुषंगाने व मा. पालकमंत्री महोदयाच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अशासकीय महिला सदस्यपदी सौ. वर्षा संदिपान घुंबाडेॅ यांची आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्याधिकारी दिपा मेधोळ - मुंडे यांनी निवड केली असुन या निवडीने सर्व स्थरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.