गेवराई:-रिक्त पदे त्वरित न भरल्यास शाळेला कुलूप ठोकू. :-शेख मोहसीन
दोनच शिक्षकावर चालतो उर्दू शाळेचा कारभार
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई येथील कन्या प्रशाला येथे आठवी ते बारावी या पाच वर्गची उर्दू माध्यमाची शाळा असून शिक्षक नसल्यामुळे दोनच शिक्षकावर चालत असून यामुळे मुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे . तरी त्वरित शिक्षकांची पदे भरून मुलींचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहरअध्यक्ष शेख मोहसीन यांनी केले असून हे पदे पंधरा दिवसात न भरल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शेख मोहसीन यांनी दिला आहे .
गेवराई येथे जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे आठवी ते बारावी असे पाच वर्ग उर्दू माध्यमाचे भरत असून या वर्गामध्ये विद्यार्थीनी संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. इयत्ता आठवी मध्ये 67 विद्यार्थीनी इयत्ता नववी मध्ये 97 विद्यार्थीनी इयत्ता दहावी मध्ये 91 विद्यार्थीनी अकरावी मध्ये 35 विद्यार्थीनी आणि बारावी मध्ये 40 विद्यार्थीनी शिक्षण घेत असून मात्र या ठिकाणी या विद्यार्थ्यांनीना शिकविण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत .या पाच वर्गासाठी दोनच शिक्षक शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर बाबीकडे शिक्षण विभाग लक्ष देत नसून अनेक वेळा शिक्षकांची रिक्त पदे भारा म्हणून लेखी निवेदने दिली आहेत .परंतु या गंभीर बाबीकडे शिक्षण विभाग हे कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. तरी ही रिक्त पदे त्वरित भरावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख मोहसीन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली असून हे पदे पंधरा दिवसात न भरल्यास शाळेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशाराही शेख मोहसीन यांनी यावेळी दिला आहे तसेच शिक्षण विभागाने देखील तात्काळ ही रिक्त पदे भरून मुलींचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.