मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Friday, September 29, 2023

गेवराईच्या उर्दू माध्यम विद्यार्थिनींशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला थेट संवाद

Share it Please
गेवराईच्या जिल्हा परिषद कन्या उर्दू माध्यम विद्यार्थिनींशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला थेट संवाद
मी स्वतः या प्रश्नाकडे लक्ष घालते, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले:-पत्रकार तथा संपादक शेख जावेद सर (मराठवाडा न्युज चैनल आणि पोर्टल)

मुख्याध्यापक व शिक्षकांनी उर्दू माध्यमाच्या शैक्षणिक समस्या मांडायला उदासीनता दर्शवली.


जिल्हाधिकाऱ्यांकडे कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी उर्दू माध्यमाच्या शैक्षणिक समस्या मांडायला हव्या होत्या. परंतु त्यांनी तसे न केल्याने पत्रकार तथा संपादक शेख जावेद सर (मराठवाडा न्युज चैनल आणि पोर्टल) यांनी जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ-मुंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शिक्षकांअभावी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, मी स्वतः या प्रश्नाकडे लक्ष घालते, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

गेवराई येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेशी संलग्न असलेल्या उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययातील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ - मुंडे यांनी गुरुवारी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थिनींना अनेक प्रश्न विचारले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उपस्थित विद्यार्थिनींनी समाधानकारक उत्तर दिले.गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी एक वाजता बीडच्या जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ - मुंडे यांनी गेवराई शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेशी संलग्न असलेल्या उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी वर्गात जाऊन उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला.

आपण उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आहात काय? आपणास मराठी व इंग्रजी विषय आहे का ? तुम्हाला मराठी व इंग्रजी लिहिता आणि वाचता येते का? दहावीनंतर विज्ञान हा विषय इंग्रजीत घेतात की, तो विषय उर्दूतही आहे ? गेवराई येथील उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखा आहे का? नाही, तर मग आपण विज्ञान शाखेसाठी कोठे प्रवेश घेता ? विद्यार्थिनींनी उत्तर दिले, बीडच्या मिल्लिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. पुढील शिक्षण घेऊन आपणापैकी डॉक्टर होण्याची कोणा-कोणाची इच्छा आहे ? असा प्रश्न विचारताच काही विद्यार्थिनींनी हात वर करून इच्छा व्यक्त केली असता, नीट परीक्षेची तयारी असू द्या, त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. त्याची तयारी तुम्ही आतापासूनच सुरू करा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. आपण कोचिंग क्लासला जाता का? तेथे नीटची तयारी कशी करावी लागते, याबाबत मार्गदर्शन केले जाते असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची जवळपास सर्वच उपस्थित विद्यार्थिनींनी समाधानकारक उत्तरे दिली. 
यावेळी जि.प. कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू सोळंके, सहशिक्षक शेख जावेद, शेख साजेद, श्रीमती फरहीन सुलताना यांच्यासह मराठी माध्यमाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023