मुख्याधिकारी यांचा बनावट लेटर पॅड तयार करूण बोगस स्वाक्षरी केल्या प्रकरणी एकावर गुन्हा
गेवराई शहरात बनावट कागदपत्र तयार करणारी टोळी सक्रीय
पोलीस स्टेशन गेवराई येथे गु.र.नं. 514/2023 कलम 420, 468, 471, 472 भा. द. वि. गुन्हा दाखल
गेवराई दि 27 ( वार्ताहार ) गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे लेटर हेड तयार करूण त्यावर बनावट स्वाक्षरी करूण बनावट शिक्का तयार केल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत एकाविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे .सदर गुन्ह्यात पोलिसांनी कसुन तपास करण्याची आवश्यकता आहे कारण गेवराई शहरात बनावट कागदपत्र तयार करणारी टोळी सक्रीय आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की , आरोपीने त्यांचे एजन्सी मार्फत चार्जिंग स्टेशन काम पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र नगर.परिषद गेवराई यांचे बनावट लेटर हेड, तयार करून त्यावर मुख्याधिकारी यांचा बनावट सही शिक्का मारून ते महानगरपालिका जालना यांना सादर केले परंतू नंतर ते पडताळणीसाठी न.प. येथे प्राप्त झाले असता ते बनावट असल्याचे निषपन्नं झाल्याने आरोपी न.प.गेवराई यांचे बनावट लेटर हेड, सही, शिक्के तयार करून फसवणुक केली आहे.अशी फिर्याद गेवराई न प चे बळीराम भोले यांनी दिली असुन चंद्रशेखर विष्णूपंत काळे राहणार बीड यांच्या विरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिष कोटकर हे करत आहेत .