मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, October 10, 2023

बीड पोलिस अधिक्षक यांच्या पथकानी वाळूच्या दोन हायवा ताब्यात घेतले;भास्कर नवलेंची कार्यवाई

Share it Please
बीड पोलिस अधिक्षक यांच्या पथकानी वाळूच्या दोन हायवा ताब्यात घेतले;भास्कर नवलेंची कार्यवाई 
50 लाखांच्या मुद्देमालासह दोन माफिया जेरबंद 

गेवराई 10 ( वार्ताहार ) बीड पोलिस अधिक्षक यांचे पथक गस्त करत असतांना राक्षसभूवन परिसरातून दोन वाळूने भरलेल्या हायवा मिळून आल्या त्यांना पावतीची विचारना केली असता त्यांच्याकडे पावती मिळून आली नाही म्हणून सदर वाळूने भरलेले दोन हायवा व दोन चालक यांच्यावर गून्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती साहय्यक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी दिली आहे .तसेच ही कार्यवाई ( दि 9 ऑक्टोबर ) रोजी रात्री 9 च्या दरम्यान केली आहे .

   याबाबद सविस्तर माहिती अशी की ,गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन व म्हाळज पिंपळगाव याठिकाणी रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक केली जात आहे त्याच अंनूषगाने बीड पोलिस अधिक्षक पथक प्रमुख साहय्यक पोलिस निरीक्षक भास्कर नवले आपल्या पथका सोबत गेवराई पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असतांना हायवा क्रंमाक यु पी 36 टी 5822 व एम एच 21 बीयु 9404 वाळूने भरून राक्षसभूवन फाट्यावर मिळून आल्या हायवा रमेश रामभाऊ शिंदे राहणार गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना व कृष्णा लक्ष्मण गिरी राहनार गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना यांना गाडी थांबवुन पावती बाबद विचारना केली असता त्यांच्याकडे पावती मिळून आली नाही म्हणून त्याच्यावर गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्यात आला असुन या कार्यवाई अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच सदरची कार्यवाई बीड पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर , अप्पर पोलिस अधिक्षक पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलिस निरीक्षक भास्कर नवले ,पो हे जगदाळे ,पो हे डिसले यांनी केली आहे .


18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023