मराठा समाजातील युवक, युवतींना मोफत संगणक प्रशिक्षण डिप्लोमा
गेवराई :-छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा समाजातील युवक युवतींसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण गेवराई शहरातील ग्लोबल कंप्यूटर येथे देण्यात येत आहे. तरी मराठा समाजातील युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल), पुणे हे प्रशिक्षण ग्लोबल कंप्यूटर गेवराई येथे देण्यात येत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ही योजना आखण्यात आली असून यातून मराठा व कुणबी मराठा समाजातील १८ ते ४५ तसेच कमीत कमी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना हे व्यक्तिमत्त्व व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी यासाठी पात्र उमेदवारांनी ग्लोबल कंप्यूटर चे संचालक जगदीश काळे यांच्याशी दुरध्वनी नंबर 9423472192 यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर ही योजना अनेक मराठा युवक युवतींसाठी लाभदायी ठरणार आहे.
मराठा समाजातील विद्यार्थांनी सारथी संस्थेमार्फत संगणक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शासनाच्या कुठल्याही कोर्सला सवलती मध्ये प्रवेश मिळत नाही परंतु सारथी संस्थेमार्फत अशा प्रकारचे मोफत कोर्स तसेच इतर शैक्षणिक सवलत सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक युवतींना मिळत आहेत. म्हणून मराठा समाजातील विद्यार्थांनी सारथी संस्थेमार्फत जे काही कोर्स तसेच इतर शैक्षणिक सवलतीचा आवश्य लाभ घ्यावा.
श्री.जगदीश काळे, संचालक
ग्लोबल कंप्यूटर, गेवराई