गेवराईत सकल मराठा समाजाकडून कँडल मार्च
मराठा आरक्षण; महिलांसह हजारो मराठा बांधवांचा सहभाग
गेवराई :-मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेल्या अंतरवाली सराटे येथील आमरण उपोषणास बसलेल्या मा.मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई शहरात साखळी उपोषण सुरु आहे. उपोषण दरम्यान गुरुवारी रात्री गेवराई शहरात सकल मराठा समाज बांधवांकडून कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी मराठा बांधवांसह महिला भगिनींची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी सराटे अंतरवाली येथे आमरण उपोषणास बसलेल्या मा.मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई तालुका मराठा समाजाच्या वतीने दि. २५ ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरु आहे. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या मराठा समाजातील बांधवांना श्रध्दांजली अर्पण करुन सकल मराठा समाज बांधवासह महिला भगिनींनीकडून कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधी घोषणांनी गेवराई शहर दणाणून गेले होते. शेवटी राष्ट्रगीताने कँडल मार्चची सांगता झाली. यावेळी महिलांसह हजारो मराठा बांधवांची उपस्थिती होती.