गेवराई:-राज ट्रव्हल्सवर बीड आरटीओची जप्तीची कार्यवाई
ट्रव्हल्सला 19 हजार 500 रुपयाचा दंड देण्यात आला आहे
गेवराई दि 28 ( वार्ताहार ) बीडच्या सागर ट्रव्हल्सचा अपघात झाला यात पाचजण मृत्यूमुखी पडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे त्यातच गेवराई येथील राज ट्रव्हल्स ही गाडी जूनी व निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती बीड आरटीओचे वाहूतूक शाखेचे साहय्यक पोलिस निरीक्षक गणेश विघ्ने यांना मिळाली व त्यांनी सदर ट्रव्हल्सची खात्री करूण ट्रव्हलस जप्त केली आहे व दंडात्मक कार्यवाई केली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड आरटीओ विभाग आता ऐक्शन मोडमध्ये आला असुन आता त्यांनी खाजगी ट्रव्हल्सवर कार्यवाई करण्यासाठी बीड आरटीओ विभाग सतर्क झाले आहे बीड जिल्ह्यात स्क्रॅप व बोगस ट्रव्हल्स या आरटीओच्या हिटलिस्ट असनार आहेत ( दि 27 रोजी ) रात्री गेवराई बसस्थानाकावर वाहन क्रं एम 04 एफ के 0148 राज ट्रव्हल्स या गाडीवर कार्यवाई केली तसेच या गाडीची तपासणी केली असता गाडीच्या बांधणीत मोठ्या प्रमाणात तफावत आढळली तसेच वाहनाचे फिटनेस बाबद योग्य ती दक्षता घेतली नसल्याचे आढळून आले तसेच बीड आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने यांनी सदर गाडीचे परमिटची विचारणा केली असता परमिट देखील या गाडीचे नव्हते व या ट्रव्हल्सला 19 हजार 500 रुपयाचा दंड देण्यात आला आहे तसेच ट्रव्हल्सची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठाकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती आहे.तसेच स्क्रप केलेल्या गाड्या किंवा जून्या असनाऱ्या ट्रव्हल्सची माहिती 9657333357 या क्रंमाकावर द्यावी व फोटो पाठवावेत अश्या ट्रव्हल्सवर कार्यवाई केली जाईल.असे अवाहनही बीड आरटीओच्या वतिने करण्यात आले आहे तसेच ही कार्यवाई बीड आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने व गेवराई पोलिस निरीक्षक धनंजय फराटे व सहकारी यांनी केली आहे.