मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Monday, October 9, 2023

निवडणुकीच्या तोंडावर आ.लक्ष्मण पवार यांना उमापूर गटात मोठा धक्का

Share it Please
निवडणुकीच्या तोंडावर आ.लक्ष्मण पवार यांना उमापूर गटात मोठा धक्का
अमरससिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शरद आहेर यांचा राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश

गेवराई दि. ९ (प्रतिनिधी) गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांची २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमापूर गटात मोठी ताकद निर्माण करणारे शरद आहेर यांनी उमापूर ग्राम पंचायतची निवडणुक लागलेली असतानाच आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काल रविवार रोजी माजी आमदार अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने आ.लक्ष्मण पवार यांना उमापूर गटात मोठा धक्का मानला जात आहे.

शरदराव आहेर हे २०१२ पासून लक्ष्मण पवार यांच्या सोबत होते २०१४ च्या निवडणुकीत उमापूर गटात आ.लक्ष्मण पवार यांना कार्यकर्ते नसताना शरदराव आहेर यांनीच गटात मोठी ताकद लक्ष्मण पवार यांना मिळवूण दिली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये शरद आहेर नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर काल अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उमापूर गटात मोठी ताकद मिळाली आहे. अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करुन गेवराई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन करणार असल्याची प्रतिक्रिया शरद आहेर यांनी यावेळी दिली.

यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, माजी जि.प.सदस्य रावसाहेब देशमुख, जयभवानी स.सा.का.माजी संचालक तुळशीदास औटी, जयदीप औटी, रफीक सौदागर, वसीम सौदागर, अझहर ईनामदार, अविनाश आहेर, लायक कुरेशी आदी उपस्थित होते.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023