अरुणाचल प्रदेशच्या ट्रॅव्हल्सवर बीड आरटीओची जप्तीची कार्यवाई
आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने व त्यांच्या पथकाची कार्यवाही
गेवराई दि 4 ( वार्ताहार ) सध्या दिवाळीचे दिवस आहेत दिवाळीमध्ये प्रवाशी यांच्याकडून अडवणूक करून प्रवाशांकडून आर्थिक लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या व तक्रारी वाढत चालल्या आहेत त्याच अंनुषगाने बीड च्या आरटीओ कडून खाजगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर मोठ्या प्रमाणात कार्यवाईचा धडाका सुरू आहे तसेच ( आज दि 4 रोजी ) अरूणाचल प्रदेशची ट्रॅव्हल्स गेवराई मध्ये जप्त करण्यात आली असुन दंडात्मक कार्यवाई बीड आरटीओ कडून करण्यात आली आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की,बीड आरटीओकडे याबाबद तक्रारी होत होत्या बऱ्याच वेळा प्रशासनाकडून दुर्लक्ष होताना दिसून येत होते. परंतु मागील आठवड्यात बीड मधील सागर ट्रॅव्हल्स चा अपघात होऊन त्या अपघातामध्ये एकूण पाच निष्पाप प्रवाशांचा बळी गेला होता. सदर अपघातातील बस ही नागालँड पासिंगची होती सदर बसचे बॉडी बिल्डिंग चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले होते.
मागील आठवड्यापासून बीड आरटीओ कार्यालयाने बस जप्त करण्याची मोहीम राबवलेली आहे यामध्ये प्रवाशांची आर्थिक लूट करणे, नियमबाह्य पद्धतीने बस बॉडी बिल्डिंग करणे ,क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसवणे इत्यादी कारणासाठी बस जप्त होत.(आज दि 4 रोजी ) पहाटे आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने व त्यांच्या पथकाने अरुणाचल प्रदेशची बस क्रमांक AP06A90870जप्त करून गेवराई डेपो येथे अकाउंट ठेवलेली आहे. सदर बस मध्ये बैठक व्यवस्था, स्लीपर व्यवस्था व मालवाहतूक करत असताना आढळली. या बसला एकूण 36 प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी असताना बसमध्ये नियमबाह्य पद्धतीने 40 सीट बांधल्याचे निदर्शनास आले. सदर बस हैदराबाद वरून जोधपुर कडे जात होती. या बसला एकूण 31500 रू एवढा दंड लावलेला आहे. प्रवाशाकडून एसटीच्या तिकिटापेक्षा जास्तीत जास्त दीडपट तिकीट ट्रॅव्हल्स आकारू शकतात. यापेक्षा जास्त तिकीट आकारल्यास 9657333357 या क्रमांकावर संपर्क साधावा व आपल्या भागात नियमबाह्य ट्रॅव्हल्स चालत असेल तर माहिती द्यावी असे अवाहन गणेश विघ्ने, आरटीओ अधिकारी यांनी केले आहे.