गूंतेगाव गोदापात्रात पोलिसांंचा छापा;चार हायवा ताब्यात सपोनि नारायण एकशिंगे व सपोनि गणेश मुंडे यांची संयुक्त कार्यवाई
गेवराई दि 23 ( वार्ताहार ) चकलांबा ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे व पोलीस अधीक्षक पथकाचे गणेश मुंडे यांची भले पहाटे 4.30 वाजता गुंतेगाव गोदा पात्रात मोठी कारवाई केली असल्याची माहिती असुन या कार्यवाईत जवळजवळ पावणे दोन कोटींचा मुद्द्यमाल केला जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रमुख नारायण एकशिंगे व पोलीस अधीक्षक पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांना गोदा पात्रांमध्ये अवैध वाळूचे उत्खनन होऊन त्याची बेकायदेशीर चोरटी वाहतूक होत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन्हीही अधिकाऱ्यांनी संयुक्त सापळा रचून गुंतेगाव नदी पात्रात पहाटे अचानक सहकारी यांच्या समवेत धाड टाकली असता नदीपात्रामध्ये वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने आलेला एक हायवा , चार टिपर व त्यांचे ड्रायव्हर, मोठ्या प्रमाणावर उत्खन केलेला वाळू साठा नदीपात्रात मिळून आला असून पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. भले पहाटे केलेल्या कारवाईमुळे वाळू तस्कराचे धाबे दनानले आहेत.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे, पोह वायबसे, आरसीपी कडील जवान तसेच चकलांबा पोलीस स्टेशन कडील प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पीएसआय आनंता तांगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चांदमारे,पोह अमोल येळे. पोलीस पोहे खटाणे, सुरवसे, पवळ यांनी सहभागी होते.