मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, November 25, 2023

काळजी घ्या पण..! सहकार क्षेत्रातल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका - सर्व सामान्य नागरीकांनी व्यक्त केली अपेक्षा

Share it Please
काळजी घ्या पण..!  सहकार क्षेत्रातल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका - सर्व सामान्य नागरीकांनी व्यक्त केली अपेक्षा 

गेवराई दि 25 वार्ताहर :-बीड जिल्ह्य़ात कार्यरत असलेल्या काही पतसंस्था, क्रेडिट संस्था आर्थिक अडचणीत आल्याने, ठेवीदारांनी सर्वच संस्था मध्ये ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे, नियमात कर्ज वाटप करून, प्रमाणीकपणे कार्यरत असलेल्या संस्थाचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, ग्राहक-ठेवीदारांनी हक्काच्या ठेवी संदर्भात जरूर काळजी घ्यावी मात्र सहकार क्षेत्रातील विश्वासाला तडा जाणार नाही. याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्राहक, कर्जदार, नागरिकांनी केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट आर्थिक अडचणीत आली. त्या बरोबरच साईराम सहकारी संस्थेच्या कार्यालयाला टाळे लागले. त्यामुळे, जिल्ह्य़ातील ग्राहकांनी अनेक संस्थेतील  ठेव रक्कम काढण्यासाठी गर्दी केली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यातील मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अफवांमुळे सहकारी संस्था चालक अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम थेट सहकारी संस्थांवर, कर्ज वाटप , कर्ज वसुलीवर पडेल, अशी भिती व्यक्त केली जात असून, एकाच वेळी ग्राहकांनी गर्दी केल्यास संस्थाचालकांना त्यांची रक्कम देणे शक्य होणार नाही.

 त्यामुळे खबरदारी बीड जिल्ह्यात पसरलेल्या अफवांमुळे मल्टीस्टेट, पतसंस्थे विषयी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ठेवीदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, सकारात्मक विचार करून सहकार्य करण्याची गरज निर्माण झालेली आहे. बीड जिल्ह्य़ात कार्यरत असलेल्या काही पतसंस्था, क्रेडिट संस्था आर्थिक अडचणीत आल्यात. ठेवीदारांनी संस्था मध्ये ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी केली आहे. नियमात कर्ज वाटप करून, प्रमाणीकपणे कार्यरत असलेल्या संस्थाचालकांना ही मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, ग्राहक-ठेवीदारांनी हक्काच्या ठेवी संदर्भात जरूर काळजी घ्यावी मात्र सहकार क्षेत्रातील विश्वासाला तडा जाणार नाही. याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्राहक, कर्जदार, नागरिकांनी केली आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023