गेवराई:-जेतवन बौध्द विहाराचे तात्काळ बांधकाम सुरु करण्यासाठी पॅथरचे म प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर आक्रमक.
निवोदनाची दखल घ्यावी नसता पॅथर्स रिपब्लिकन पक्षाच्या वतिने आंदोलन छेडले जाईल असा ईशारा देत आहोत
गेवराई:- भिमनगर येथील जेतवन बौध्द विहार मोडकळीस आले होते ते पाडुन जवळपास महीना होत आला असुन ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिन असुन या ठिकाणी कॅन्डल मार्च असतो परंतु बौध्द विहाराचे कामच सुरु नसल्यामुळे आम्ही कार्यक्रम कुठे करायचा असा प्रश्न उपस्थीत होत आहे पुढे १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुध्दा जवळ आली आहे तरी मे मुख्याधिकारी साहेब यांनी आमच्या जेतवन बौध्द विहाराचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी या पुर्वी सन २००८ पासुन शासन दरबारी पॅथरचे म प्रदेश प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर हे करत आलेले आहेत ते आजतगायत गेवराई नगर परिषदेने जेतवन बौध्द विहाराला निधी मंजुर केला असुन मा नगराध्यक्ष सुशिलजी जवजाळ यांनी उध्दघाटन केले परंतु प्रत्याक्षात काम मात्र सुरु केले नाही याचा अर्थ काय समजायचा असा प्रश्न उपस्थीत होत आहे तरी मे साहेबांना विनंती करण्यात येते की आमच्या
१)जेतवन बोध्द विहाराचे तात्काळ बांधकाम सुरु करुन भव्यदिव्य बौध्द विहार बनवावे
२) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी विद्यापीठासारखी कमान करण्यात यावी
३) बौध्द समाजाच्या स्मशानभुमीमध्ये भरपुर प्रमाणात झाडे आली असुन तेथे घाणीचे साम्राज्य झाले आहे ते तात्काळ साफसफाई करावे
४) बौध्द स्माशानभुमीच्या बाजुला असलेल्या स्वच्छालयामुळे त्या ठिकाणी घान वास दुर्गंधी नेहमी होते म्हनुन त्या ठिकाणा ऐवजी ईतरत्र नवीन स्वच्छालय बांधण्यात यावे जेणे करुन मयतीच्या वेळी त्या ठिकाणी समाज बांधवांना त्या ठिकाणी थांबता येईल
५)भिमनगर येथील बौध्द स्माशानभुमी येथे मयतीला आलेल्या बांधवांना बसन्याची व्यवस्था करावी अशी मागणी करत आहोत तरी या निवोदनाची दखल घ्यावी नसता पॅथर्स रिपब्लिकन पक्षाच्या वतिने आंदोलन छेडले जाईल असा ईशारा देत आहोत