अकृषी क्षेत्रात प्लॉटिंग;फसवणूक करनाऱ्या टोळीवर गून्हा दाखल करण्याची मागणी
कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन चा ईशारा.
नगर परिषदेने आरक्षीत क्षेत्र ताब्यात घ्यावे.
गेवराई दि 26 ( वार्ताहार ) शहरात भरवस्तीत अकृषी असलेल्या क्षेत्रात प्लॉटिंग टाकून करोडो रुपयांचा डल्ला मारनाऱ्या या बीड व गेवराईच्या टोळीवर गून्हा दाखल करण्याची मागणी गेवराई च्या मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,तळेवाडी परिसरात गेवराई तलाठी सज्जा तसेच नगर परिषद हद्दीमध्ये सर्वे नंबर 214 मध्ये अकृषी क्षेत्र आहे यामध्येरिंगरोड ,स्मशानभूमी,ग्रिन झोन व मंजूरसंस्था नावे आरक्षीत क्षेत्र आहे यामध्ये खाजगी अभियंता याकडून कच्चे लेआऊट तयार करून बिसमिल्ला कॉलनी च्या नावाने अनेकांची फसवणूक होत असल्याची माहिती आहे बीड आणि गेवराईच्या खाजगी दलालांनी सदर जमिन आपल्या बापाची जाहागिर समजून विक्री करण्याचा विडा उचलला आहे याला कुठलीही शासकीय परनवागी नाही,तरी देखील या परिसरात दणदणीत प्लॉटिंग व्यावसाय सुरू आहे याला प्रशासनाने आतापर्यंत साधी नोटीस देखील बजावली नाही ही शोकांतिका भरदिवसा सामान्य नागरिकांची फसवणूक करनाऱ्या या टोळी विरूद्ध गून्हा दाखल करण्याची मागणी गेवराईचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती आहे.