मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Saturday, December 30, 2023

म्हतारपणाचं कुत्तरपण सुनाने दोघांचं केलं,सासु सासर्यांला चाकुचा धाक दाखवत धमकावलं

Share it Please
म्हतारपणाचं कुत्तरपण सुनाने दोघांचं केलं, सासु सासर्यांला चाकुचा धाक दाखवत धमकावलं

मरणाच्या दारात टेकलेल्या म्हातार्या सासु सासर्यास सुनेकडुन मारहाण ?

गेवराई पोलीस स्टेशनने दखल  घेऊन कारवाईचे दिले आदेश!

गेवराई :- कलयुगात काय घडेल हे सांगताच येत नाही. आजपर्यंत आपण सासु सासर्याने सुनेवर केलेल्या अत्याचाराच्या हजारो घटना ऐकल्या असतील किंवा आजही कुठे ना कुठे ऐकतच आहोत .परंतु एका सुनेने आपल्या म्हातार्या सासु सासर्यावर अत्याचार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खांडवी  गावात घडली आहे. याबाबत सविस्तर व्रुत्त असे कि, गेवराई तालुक्यात खांडवी या गावात  संभाजी गहनाजी भोले वय 75 , व कलाबाई संभाजी भोले 70 वर्षे हे व्रुध्द दांम्पत्य रहातात. यांना दोन मुले मोठा समाधान व लहान दिलीप भोले असे आहेत. आयुष्यभर रोजंदारी करुन आपल्या या दोन्ही मुलांना या दोघांनी जतन केले, लग्न कार्य करुन संसाराला लावले. परंतु लहान मुलगा दिलीप याची पत्नी नामे मिरा ही लग्नानंतर एक ते सव्वा वर्षच आनंदाने व मिळुन मिसळून राहीली.मात्र नंतर मिरा हिने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. छोटया छोटया कारणावरून ति घरात भांडणे काढु लागली . सासु सासर्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ ती करु लागली , मोठा मुलगा समाधान हा अतिशय शांत व समजुतदार असल्याने आपल्या लहान भावजयी मिरास त्याने हजारो वेळा समजावून सांगितले. परंतु आपल्या लहान भावजयी असणार्या मिरामध्ये काहीच फरक पडेना , मग ती या मोठया दिराच्या मागे लागली व काहीना काही कुरापत करुन शिवीगाळ करणे, किंवा एखाद्या गडयागत अंगावर धावुन जाणे हे मिरा हिने प्रकार सुरू केले. संभाजी व कलाबाई या सुनेच्या भितीने अक्षरशा काही अंतरावर भाडयाने राहु लागले, आणि आपला स्वयपाक स्वतहाच्या हाताने दिसत नसतांनाही करु लागले .सासु सासर्यास मोठया दिराने जेवण दिले तरी मिरा हिस खपत नव्हते , म्हणून नाविलाजाने त्यांनी भाडयाची रुम घेऊन  स्वतहा बनवून खाऊ लागले. संभाजी भोले यांचा मुलगा समाधान हा आपल्या घरात तापेने फणफणत पडलेला होता . आणि घराच्या बाहेर काही मुले गोंगाट करत होती. म्हणुन समाधान भोले यांचा मुलगा नामे विशाल समाधान भोले हा या मुलांना गोंगाट करु नका, थोड लांब जाऊन खेळा म्हणाला. या छोटयाशा गोष्टीवरच मिरा यांचे पित्त खवळले आणि एखाद्या गडयागत  येऊन या मिराने विशाल यास लाकडाने प्रचंड मारहाण केली . 

संभाजी व कलाबाई भोले हे आपल्या नातवाला मार खाताना बघुन मध्ये गेले असता या दोघांना मिराने लाथाबुक्याने मारहाण केली आणी अर्वाच्य भाषेतील शिव्या घातल्या , एवढयावरच न थांबता विशाल समाधान भोले या पुतण्यास मारुन टाकण्याच्या हेतुने दगडी चिरा उचलुन विशालच्या डोक्यात मारणार एवढयात काही लोकांनी प्रसंगावधान बघुन या मिराच्या हातातील दगडी चिरा हिसकावला आणि सुदैवाने विशाल समाधान भोले या मुलाचा जिव वाचला. तेव्हापासून मि तुम्हाला चाकु खुपसून एका मिनीटात मारुन टाकीन अशा धमक्या या मिरा आपल्या सासु ,सासरा , दिर आणि पुतण्याला वारंवार देत आहे. मि एक हाप मर्डर पचवला , माझं पोलीस पण काय वाकडं करत नाही अशी ती वारंवार धमक्या देते.कारण दहा बारा वर्षापूर्वी गावातीलच भावकीच्या माणसाला मिराने चाकु मारला होता, आणि ति या गुन्हयातून सुटली आहे अशी माहिती मिळत आहे. सततच्या या त्रासाला कंटाळून आणि जिवाच्या भितीने संभाजी व कलाबाई भोले हे विषारी औषध पिऊन जिवनयात्रा संपवण्याचा निर्णयावर आले होते. परंतु सुदैवाने गेवराई पोलीसांनी या म्हातार्या दांम्पत्याची करुण कहानी ऐकुन घेतली आणि तात्काळ गुन्हा दाखल करुन, मिरा दिलीप भोले हिच्यावर  भा.द.वी 324 ,506 ,504 प्रमाणे रितसर गुन्हा नोंद केला आहे. आणि घाबरु नका आणि टोकाचे पाऊल उचलु नका असा दिलासा देत लवकरात लवकर मिरा दिलीप भोले हिच्या विरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पो.हे.काँ.आघाव हे कारवाई करत असुन लवकरच या व्रुध्द दांम्पत्याला आम्ही कारवाई करुन न्याय देऊ असे आश्वासन गेवराई पोलीसांनी दिले आहे.खरच आयुष्यभर लोकांच्या कामावर जाऊन आपल्या पोटच्या दोन मुलांचा सांभाळ करुन या वयोव्रुध्द संभाजी व कलाबाई भोले यांच्या म्हतारपणाचे कुत्तरपणचं सुनेने केले आहे अशी चर्चा जिल्ह्यातील नागरिक करु लागले आहेत.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023