आज गेवराई येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) ची महत्वपूर्ण बैठक संपन्न
या गेवराई तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
गेवराई :-आज दिनांक 31 डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ )ची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन रि पा ई गेवराई तालुकाध्यक्ष किशोरजी कांडेकर यांच्यावतीने करण्यात आले होते या महत्त्वपूर्ण बैठकीच्या निमित्ताने रिपाई गेवराई तालुका पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली सिंधी हॉल आय टी आय कॉलेजच्या समोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून (युवा रिपाई प्रदेशअध्यक्ष महाराष्ट्र राज्य) माननीय पप्पूजी कागदे साहेब व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले यावेळी (रिपाई गेवराई तालुकाध्यक्ष ) किशोरजी कांडेकर यांचे भाषण झाले तसेच( युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज् मा, पप्पू जी कागदे साहेब यांनी अठरापगड जातींच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियावर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला
यावेळी सय्यद एजाज इफ्तेखार अहमद यांची युवा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली राजेंद्र साहेबराव कदम यांची तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली दत्तात्रेय बबन बनसोडे यांची युवा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली श्रीमती कविता अर्जुन डोंगरे यांची महिला तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली सुरेखा संतोष सुरवसे महिला शहराध्यक्षपदी जितेंद्र त्रिंबक खरात युवा तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र बाळासाहेब निकाळजे युवा तालुका सचिव पदी अमोल बाबुराव लोखंडे तालुका सहसंघटक पदी भारत लक्ष्मण मोरे तालुका युवा संघटक पदी सिद्धार्थ उर्फ पप्पू अशोक पोटफोडे युवा तालुका संघटक पदी गौतम महादू उनवणे तालुका कोषाध्यक्षपदी सुरेश मुरली गायकवाड उमापूर युवा सर्कल प्रमुख पदी संदीप राम प्रधान धोंडराई युवा सर्कल प्रमुख पदी व सुमेध प्रल्हाद करडे यांची तलवाडा युवा सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी प्रमुख पाहूने म्हनुन हरीश शेठ मंघारमाणी (व्यापारी संघटना सहसचिव गेवराई) गौतम भाऊ काडेकर महादेव बनसोडे (माजी नगरसेवक)संय्यद एजास भाई मुस्ताक कुरेशी राजाभाऊ जोगदंड आर पी आय जिल्हा सरचिटणीस सुनील डी काडेकर विजय सौंदरमल छगन खरात बाबासाहेब भोले व अनेक कार्यकरते आणी नागरिक उपस्तित होते