मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Thursday, January 18, 2024

गेवराई पोलिस ठाणे प्रमुखासाठी लॉबिंग सुरू

Share it Please
गेवराई पोलिस ठाणे प्रमुखासाठी लॉबिंग सुरू 
संजय लोहकरे,प्रविणकूमार बांगर यांची नावे चर्चेत 

गेवराई दि 18 ( वार्ताहार ) गेवराईचे पोलिस निरीक्षक धंनजय फराटे यांची बीड लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर संभाजी नगरला नुकतीच बदली झालेच्या आदेश आयजी कडून निघाले असतांना आता गेवराई पोलिस ठाणे प्रमुख पदासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती असुन पोलिस निरीक्षक संजय लोहकरे व पोलिस निरक्षक प्रविणकूमार बांगर यांची नावे गेवराई पोलिस ठाणे प्रमुखांच्या पदासाठी चर्चेत आहेत.

   याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुका नेहमिच क्राईम व अवैध धंद्याचे माहेरघर आहे तसेच याठिकाणी कायदा व सुवेस्थेच्या दृष्टीकोनातून खमक्या अधिकारी याठिकाणी येणे आवश्यक आहे तसेच सन 2011 व 2012 या सालात गेवराई गून्हेगारी विश्वाचं केंद्र होते परंतू या दोन वर्षात गेवराई कर्तव्यदक्ष तसेच शिस्तप्रिय असलेले पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी गून्हेगार याचं कर्दनकाळ म्हणून यशस्वी कार्यकाळ संभाळला होता आजही गून्हेगार त्यांच नाव ऐकलंतर थरकाप सोडतात पुन्हा ऐकदा या ठिकाणी त्यांना पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर संधी देतील का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे तसेच गेवराई तालुक्याती तलवाडा या ठाण्याची धूरा पोलिस निरीक्षक प्रविणकूमार बांगर यांनी संभाळली आहे तसेच ते देखील गेवराई पोलिस ठाण्यासाठी दावेदार ठरू शकतात अशी देखील चर्चा आहे तसेच येणाऱ्या चार दिवसांत ठाणेप्रमुखांची जबाबदारी पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर देतील तसेच आदेश ही नुतन ठाणे प्रमुखांना मिळणार असल्याची माहिती असुन बीड जिल्ह्यात गेवराई पोलिस ठाणे चर्चेचा विषय ठरत आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023