मुसलमानांच्या हत्या करुन राममंदीर बांधले , उद्घाटनावर आता दहशतवादाचे सावट?
दशहतवादी संघटनाच्या धमकी मुळे आयोध्येत हाय अलर्ट!
बाबरी मस्जिद पाडुन त्या वादग्रस्त जागेवर आता भव्य अशा राममंदीराचे निर्माण करण्यात येऊन उद्या दि. 22 जानेवारी रोजी या मंदीराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा होणार आहे. शेकडो वर्षापासून बाबरी मस्जिद विरुद्ध राममंदीर वाद दोन समुदायामध्ये सतत धगधगत राहीला आहे. परंतु शेवटी 9 नोव्हेंबर 2019 ला कोर्टाने निकाल देत या जागेवर राममंदीर बांधण्यासाठी परवानगी दिली. तेंव्हापासुनच या मंदीराचे निर्माण कार्य सुरू होते ,आणी आत्ता हे निर्माण कार्य संपुन मंदिर पुर्ण झाले आहे आणी भारतीय ईतिहासात 22 जानेवारी 2024 हा दिवस नोंद करण्यात येईल कारण याच दिवशी या मंदीराचे उद्घाटन पार पडत आहे. परंतु आता या मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळयावरुन जैश् ए मोहम्मद नावाच्या दहशतवादी संघटनेने शुक्रवारी रात्री धमकी दिली आहे कि निर्दोष मुसलमानांच्या हत्येनंतर या मंदीराचे निर्माण करुन या राममंदिराचे उध्दघाटन केले जातआहे.राममंदीर उध्दघाटनाच्या सोहळयाला अवघा काही अवधी राहीलेला असतांनाच जैश् ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेने निर्दोष मुसलमानांच्या हत्येनंतर राममंदीराचे उध्दघाटन केले जात आहे अशी टिप्पणी केल्यामुळे संपुर्ण भारतात यावरून खळबळ माजली आहे. कारण जैश् ए मोहम्मद हि कट्टर अशी दशहतवादी संघटना असुन , या धमकीमुळे उद्या होणार्या राममंदीर सोहळयाच्या निमित्ताने काही घातपात घडु शकतो ? असा सशंय व भिती आता निर्माण झाली आहे. दरम्यान सुरक्षा आणी गुप्तचर यंत्रणांना मधील सुत्रांनी संपूर्ण परिस्थिती आपल्या नियंत्रणात असुन तरी देखील जैश् ए मोहम्मद ने केलेल्या टिप्पणीमुळे आमच्या यंत्रणा सावधानता बाळगून आहेत.या धमकी मुळे आयोध्येत हाय अलर्ट लावण्यात आला असुन अतिशय बारकाईने सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत अशी माहिती मिळत आहे.राममंदीराची प्राणप्रतिष्ठा हा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच काही दिवसांनी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन जवळ येत असल्यामुळे नवी दिल्लीत साजरा होणार्या प्रजासत्ताक दिनामुळे संपूर्ण देशाची सुरक्षाव्यवस्था हाय अलर्ट वर आहे.आणी जैश् ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या टिप्पणीला आम्ही निरर्थक माणतो असे सरंक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.हे वक्तव्य जरी जैश् चे असले तरी यामागे पाकिस्तानी आय एस एस ही संस्था असु शकते कारण जैश् ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना त्यांचंच प्रतिनिधित्व करते. जैश ने आयोध्येतील राममंदीराबाबत दिलेल्या धमकीत म्हटले आहे कि या मंदीराची अवस्था अल अक्सा मस्जिदी सारखी होईल. अल अक्सा मस्जिद ही जेरुसलेम या ठिकाणी असुन, हे ठिकाण मुस्लिम समुदायासाठी जगातले तिसर्या क्रमांकाचे पवित्र समजले जाणारे स्थान आहे, सध्या जाँर्डन नावाचा देश अल अक्सा मशिदीची व्यवस्था पहातो परंतु आणी गैर मुस्लीमांना या ठिकाणी येण्यास परवानगी आहे पण ते या ठिकाणी प्रार्थना करु शकत नाहीत.जैश ए मोहम्मद ने दिलेल्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आलेल्या आहेत तर दुसरीकडे राममंदीराचे उध्दघाटनाची तयारी युध्द पातळीवर सुरू असुन अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी 22 जानेवारी रोजी दुपारी 12:15 ते 12:45 वाजता या मंदीरात प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त ठरला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे या सोहळयाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत आणी या सोहळयासाठी देशभरातील 7000 पेक्षा जास्त मान्यवर लोकांना आमंत्रित करण्यात आले आहेच परंतु देशातील लाखो नागरिक सुध्दा आयोध्येतील सोहळयासाठी उपस्थित राहणार आहेत. यामुळे सध्या सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख आणी हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणानी माहीती दिली आहे.