गौण खनिज अधिकाऱ्याला दादागिरी करूण हावया पळवली
गेवराईच्या राक्षसभूवन फाट्यावर माफिया राज
गेवराई दि 24 ( वार्ताहार ) गेवराई तालुक्यात वाळू उपसा बंद होनाच्या मार्गावर दिसत नाही राक्षसभूवन फाट्यावर शंभर पेक्षा जास्त फोरव्हिलरचा ताफा वाळू माफियांचा आहे तसेच आज ( दि 24 रोजी ) आठच्या दरम्यान संभाजीनगर येथून बीड कडे येत असतांना राक्षसभूवन फाट्यावर एक हायवा अनाधिकृत भरून बीडच्या दिशेने निघत असतांना ती गाडी गौणखनिज अधिकारी माधव काळे यांनी पकडली परंतू शंभर ते दिडशे वाळू माफियांनी त्यांना दादागिरी व मुजोरी करून हायवा पळवली असल्याची माहिती आहे
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई तालुक्यात वाळू उपसा सुरूच आहे तसेच तहसिलदार यांचे याठिकाणी नियत्रंन नाही तहसिलदार पेक्षा होमगार्ड बरा अशी म्हणन्याची वेळ गेवराई महसुलवर आली आहे बीड येथिल अधिकारी गोदापात्रात कार्यवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांने खालचे अधिकारी सहकार्य करत नाहीत पोलिसही वेळेवर येत नाहीत अनेकवेळा महसुली व गौणखनिज अधिकारी यांनी त्यांना संपर्क केला परंतू कूनीही त्यांना रिसपॉन्स दिला नाही माफियांची दादागिरी बघायची असेल तर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी रात्रीच्या वेळी राक्षसभूवन फाट्यावर भेट द्यावी तसेच संभाजी नगरला न्यायालयीन कामकाजासाठी बीड गौणखनिज अधिकारी माधव काळे गेले होते परत येत असतांंना रात्री आठच्या दरम्यान एक हायवा राक्षसभूवन फाट्यावरून बीडच्या दिशेने जात असतांना दिसला त्यांनी कार्यवाईसाठी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू गौणखनिज अधिकारी माधव काळे यांना राक्षसभूवन फाट्यावर असनाऱ्या शंभर ते दिडशे वाळू माफियांनी दादागिरी करून तो हायवा पळवला असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.