सरकार मराठा समाजाची चेष्टा करुन ,मराठयांना फसवत आहे:- आ.रोहित पवार
चलो मुंबई म्हणत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी मुंबई कडे कुच केले आहे.यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा अधिकच तिव्र सुरू झाला आहे हे लक्षात येत आहे, मुंबईत 26 जानेवारी पासून आमरण उपोषण करत मराठा आरक्षणाची मागणी करणार आहेत. मनोज जरांगेची सर्व बाजुने मणधरणी केलेली फोल ठरली असुन , काल जरांगेचा ताफा मुंबईच्या दिशेने कुच झाला आहे.आता शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.रोहित पवार म्हणाले कि मनोज जरांगेची भुमिका योग्य आहे मनोज जरांगेचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला तेंव्हा आता कुठे सरकारची धावपळ सुरू झाली आहे.आजपर्यंत तुम्ही झोपला होतात काय? तुम्ही मराठा समाजाची चेष्टा करुन मराठयांना फसवता का ?असा सवालही रोहित पवार यांनी विचारला. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, त्यांना कशीतरी लोकसभेची निवडणूक जिंकायची आहे असा गंभीर आरोप करत आ.रोहित पवार म्हणाले कि, मुंबईतील आंदोलनानंतरच हे सरकार जागे होईल.खरेतर सरकारने योग्य पावले उचलण्याची गरज होती. येणार्या सात दिवसात तुमच्या कडे सगळी माहिती येणार आहे काय? कोणतेही सर्वे हे घाईगडबडीत होत नसतात घाईगडबडीत केलेल्या सर्वे मुळे आणी चुकीच्या प्रक्रीयेमुळे अन्याय होण्याची शक्यता जास्त आहे असेही रोहित पवार म्हणाले