मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, January 30, 2024

गेवराई शहरात भु माफिया राज चक्क रस्ता खादुन प्लॉट विक्री होत आहे.नगर परिषद कार्यालयाची काही हरकत नाही.

Share it Please
गेवराई शहरात भु माफिया राज चक्क रस्ता खादुन प्लॉट विक्री होत आहे.नगर परिषद कार्यालयाची काही हरकत नाही.

तक्रार देऊन ही नगर परिषद प्रशासण हरकत घेत नाही काय कारण होऊ शकते नागरिकांत चर्चा.

पदमकुमार हिरालाल गंगवाल यांना कोणाचे वर्धहस्य मिळत आहे?

सर्वे नं. ६४/० मधील लेआउट मालक नगर परिषद हद्दीतील रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून स्वतःच्या फायद्यासाठी रस्ता विकत असल्यामुळे कार्यवाही चे निवेदन.

 श्री विष्णू लक्ष्मण जवंजाळ यांचा या कार्यालयास प्राप्त अर्ज आ. क्र. ५६८० / २०२३ दि. १५/१२/२०२३.

 श्री नरुटे दिलीप बाबुराव यांचा या कार्यालयास प्राप्त अर्ज आ.क्र.१७००/२०२३ दि. १४/१२/२०२३.

 श्री. सोलाट जयसिंग अनुरुद्र यांचा या कार्यालयास प्राप्त अर्ज आ. क्र. १७५३/२०२३ दि.20/१२/२०२३.

 या कार्यालयाचे पत्र जा. क्र. २७७२/२३ दि.२७/१२/२०२३.

 श्री. पदमकुमार हिरालाल गंगवाल यांचा या कार्यालयास प्राप्त अर्ज आ.क्र. १३६ दि. ०८/०१/२०२४. . उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय विविध तक्रारी अर्ज या कार्यालयास प्राप्त झाले होते.

सदरीत तक्रारी अर्जानुसार दै. रिपोर्टर या वृत्तपत्रामध्ये दि. १४ / १२ / २०२३ रोजी पान क्र. ७ वर विधिज्ञ अॅड. के. व्ही. दाभाडे यांचेतर्फे नगर परिषद हद्दीतील सर्वे नं. ६४/क, प्लॉट नं. १ व ४, सेंट झेटीअर्स हायस्कूल जवळ, जुना बैठन रोड, गेवराई ता. गेवराई जि.बीड प्लॉट नं. १ ज्याचे क्षेत्रफल १३३.३७ चौ.मी. व प्लॉट नं. ४ ज्याचे एकूण क्षेत्रफळ ११.०० चौ. मी. हि श्री. पदमकुमार हिरालाल गंगवाल यांची जागा श्री. घनशाम रमेशदास वैष्णव, रा. गेवराई यांना विक्री करणार असल्याने श्री घनशाम रमेशदास वैष्णव यांचे तर्फे विधिज्ञ अड. के. व्ही दाभाडे यांनी उक्त जागे बाबत कोणाचा काही हक्क व हितसंबंध असल्यास व कोणाचा काही आक्षेप असल्यास श्री. घनशाम रामेशदास वैष्णव यांस संपर्क करावा असे जहीर प्रगटन दिले होते. सदरील जहीर प्रगटनाच्या अनुषंगाने संदर्भ क्र. १,२,३ नूसार या कार्यालयाकडे आक्षेप अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे या कार्यालयाने सदरील प्रकरणाची शहानिशा करणे करिता उक्त जागेचा खरेदी विक्री व्यवहार संदर्भ क्र. ४ च्या पत्रानुसार तूर्तास थांबविला होता, संदर्भ क्र. ७ नुसार श्री. पदमकुमार हिरालाल गंगवाल यांनी सदरील जागेची सर्व कागदपत्रे या कार्यालयात दाखल केली आहेत व सदरील प्रकरणाची शहानिशा केली असता है. रिपोर्टर या वृत्तपत्रामध्ये दि. १४/१२/२०२३ रोजी पान क्र. ७ वर विधिज्ञ अॅड. के. व्ही. दाभाडे यांचेतर्फे देण्यात आलेल्या भूखंडाचे क्षेत्र हे मा. नगर रचनाकार बीड यांनी मंजूर केलेल्या अभिन्यासातील भूखंडाशी जुळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सदरील जागेचा खरेदी विक्री व्यवहार करण्यास या कार्यालयाची हरकत नाही. असे आपणास या पत्रान्वये कळविण्यात येत आहे. 

 श्री. पदमकुमार हिरालाल गंगवाल यांना हि प्रत देऊन कळविण्यात येते कि आपण उक्त जागेचा खरेदी-विक्री व्यवहार करण्यास या कार्यालयाची काही हरकत नाही.

अँड के. व्ही. दाभाडे, गेवराई यांना हि प्रत देऊन कळविण्यात येते कि आपल्या पक्षकाराव्या जागेचा खरेदी विक्री व्यवहार करण्यास या कार्यालयाची हरकत नाही.

श्री. विष्णू लक्ष्मण जवंजाळ श्री नरुटे दिलीप बाबुराव, श्री. सोलाट जयसिंग अनुरुद्र, रा. गेवराई आपणास या पत्रान्वये कळवून आपले अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. मुख्याधिकारी नगर परिषद, गेवराई

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023