मराठवाडा न्युज ठळक बातमी हा पोर्टल उद्योग आधार रजिस्ट्रेशन आहे MH05E0017938 मुख्य संपादक शेख जावेद शेख बनेमिया (९५९५७१३३१३)

Tuesday, January 9, 2024

युसुफ वडगाव च्या राहुल कांबळे या शिक्षकास शरद पवार फेलोशिप प्राप्त!

Share it Please
युसुफ वडगाव च्या  राहुल कांबळे या शिक्षकास शरद पवार फेलोशिप प्राप्त!

राज्यातुन फक्त 40 शिक्षकांची झाली होती निवड,
बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात मिळवला मानाचा तुरा!

बीड :- शिक्षक म्हणजे देशाला सुसंस्कृत नागरीक देणारा,मुलांच्या आयुष्याला योग्य वळन लावुन आयुष्याच्या वाटा जगण्यासाठी तयार करणारा योध्दा, मुलांची पहीली गुरु आई जरी असली तरी आई ईतकाच महत्वाचा असणारा असतो तो त्याचा शिक्षक , आपण उच्च पदावर किंवा आयुष्याची खडतर वाट जगुन जिवनाचे यशस्वी शिखर गाठनार्या महान लोकांची यशोगाथा ऐकत असतांना, त्याच्या यशोगाथेतील शिक्षकांचे असणारे परमोच्च स्थान ऐकत असतो.कारण गुरु विना नाही जिवनाची महती .असेच एक शिक्षक युसुफ वडगाव विद्यालयात विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे महान कार्य करतात ते म्हणजे कांबळे आर. एन अर्थात राहुल कांबळे सर. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मु.धानोरा ( रुई ) हे त्यांचे मुळ गाव, परंतु वडील शासकीय दुध डेअरी बीड येथे असल्यामुळे बालपण आणि शालेय शिक्षण बीडमधील जि.प.प्राथमिक शाळा ,अशोक नगर बीड या शाळेत झाले ,आणि महाविद्यालयीन शिक्षणा नंतर मला शिक्षक व्हायचे आहे हे स्वप्न उराशी बाळगुन औरंगाबाद च्या मराठवाडा काँलेज आँफ एज्युकेशन आझाद कँम्पस या ठिकाणाहुन त्यांनी बी.एड् ची पदवी घेतली आणि युसुफ वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक  या विद्यालयात ते गेली 19 वर्षांपासून पासून शिक्षक होऊन 9 वी आणि 10 च्या विद्यार्थांना ज्ञानदानाचे काम करतात. लहानपणापासून कलाक्षेत्राची आवड राहुल कांबळे यांना होती .कलाक्षेत्रातील नाटक, एकांकीका स्पर्धेत त्यांनी कलावंत म्हणुन पेटवु क्रांतीची मशाल, दलीत हत्याकांड व यातना उत्सव  नावाच्या ज्वलंत विषयावरील नाटकांमधुन अभिनय केलेला आहे. यातना उत्सव हे नाटक आजही औरंगाबाद विद्यापिठाच्या एम.ए मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात आहे . आणि यातना उत्सव नाटकाचे पहिल्या प्रयोगाचे मानकरी कलावंत म्हणुन राहुल कांबळे यांचे नाव आहे. परंतु आपल्या आवडीच्या कलाक्षेत्रात घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना फार काळ काम करता आले नाही. आणि त्यांनी जिवनातले शिक्षक होण्याचे  स्वप्न उराशी बाळगुन आपल्या स्वप्नांची पुर्ती शिक्षक होऊन केलीच. ..... या विद्यालयात जसे ते शिक्षक म्हणून रुजु झाले . तसे  विद्यार्थांना ते शिक्षणासोबत नाटक,एकांकिका, लोककला, कविता, कथाकथन याचे मनोरंजनात्मक शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ लागले.या मनोरंजक आणि सोप्या भाषेतील ज्ञानदाना मुळे ते या युसुफ वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व सहकार्यांचे आणि विद्यार्थांचे आवडीचे शिक्षक बनले.शालेय शिक्षणाबरोबरच " पौगंडावस्थेतील विद्यार्थांच्या समस्या निराकरणासाठी कार्यक्रम विकसन"  या विशेष विषयातुन राहुल कांबळे या शिक्षकाने पौगंडावस्थेतील विद्यार्थांना योग्य ते लैंगिक शिक्षक, त्यातून उदभवणारे धोके, सामाजिक मुल्य,बालविवाह आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या जिवनाला योग्य मार्गदर्शन करुन दिशा देण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पौगंडावस्थेतील मुलांसाठी हे कार्यक्रम आयोजित करुन डाँक्टर , खेळाडु, कलावंत यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवतात व या पौगंडावस्थेतील मुलांना योग्य ते शिक्षण देऊन सुसंस्कृत नागरीक बणवण्याचे महान कार्य ते करतात. युसुफ वडगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राहुल कांबळे यांच्या या महान कार्याची दखल खा.सुप्रिया ताई सुळे यांनी घेतली. आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदीवसा निमित्त दिली जाणारी "शरद पवार इन्सपायर फेलोशिप 2023-2024 साठी राहुल कांबळे यांची निवड करण्यात आली.या फेलोशिप मधून रोख 60,000/- साठ हजार रुपये आता राहुल कांबळे यांना फेलोशिप म्हणुन मिळनार आहेत. महाराष्ट्रातुन एकुण  प्राथमिक शिक्षक 20 व माध्यमिक 20 शिक्षकांचीच निवड या विशेष फेलोशिप साठी करण्यात येते. यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव सारख्या छोटयाशा गावातुन विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबतच पौगंडावस्थेतील शिक्षण देणारे शिक्षक राहुल कांबळे सर यांची निवड झाली ही बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे. शरदचंद्रजी पवार  इन्सपायर फेलोशिप राहुल कांबळे यांना मिळाल्यामुळे ,शिक्षण क्षेत्रातील हजारो मान्यवरांनी राहुल कांबळे यांचे कौतुक करत शुभेच्छा तर दिल्याच आहेत. परंतु बीड जिल्ह्यातील नागरीकांनी सुध्दा या फेलोशिप मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023

18/12/2023